पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १५१ मध्यें मृत्युसंख्येचे प्रमाण पुष्कळ पटीनें ज्यास्त असतें. पानासक्तीमुळे वेडाचें प्रमाण ज्यास्त होतें. आणि चलन व स्पर्शज्ञाननाश ( पॅरलि- सिस) ह्यांची संख्या ज्यास्त होते. मसाले ( काँडिमेंट्स् Condiments ) शिरका (विनीगर Vinegar) : - पांढरी वाइन अथवा माल्ट यांवर आसिटस फर्मेन्टेशन जातीची फेसाळण्याची क्रिया केल्यानें विनीगर तयार होते. माल्ट न केलेली बाजरी (बाल), मका, तांदूळ व दुसरीं धान्यें यांपासून व शर्करा व गुळाची राब ह्यांपासून केलेली विनीगर माल्ट विनीगर म्हणून कधीं कधीं विकतात. शिरक्याची आम्लता तीव्र ( ग्लेशिअल ) अॅसेटिक ॲसिडाच्या मानानें शेकडा ३ ते ५ असावी. शिरक्यामध्यें गंधकाच्या तेजाबची ( सल्फ्यूरिक अॅसिड ) फार भेळ घालतात. ह्या ॲसिडानें शरिरांत अविद्राव्य सल्फेट होतात व ते शरिरांत अपायकारक असतात. शरीरांत अॅसेटिक अॅसिड निर्वीर्य होतें व त्याचा द्राव्य क्षारमय ( आल्कलैन ) कार्बोनेट होतो. लोणचीं, मासे इत्यादि, धातूंच्या डब्यांतील पदार्थांत शिरका घातला असल्यास त्यांची परीक्षा करावी. डबे व कुप्यांतील खाद्यः - शेती कमी असणाऱ्या इंग्लंडसारख्या देशांत खाद्य पदार्थांचे डबे फार वापरतात. व त्यांचा प्रचार वाढत आहे. जें अन्न एहवीं नासतें तें डब्यांत ठेवल्यानें टिकतें. म्हणून ह्या व्यवस्थेमुळें राहणीचा खर्च कमी येतो. वसाहति, सैन्य, आरमार व अज्ञात प्रदेशांचा शोध लावणारे संघ ह्यांना डब्यांतील अन्नाचा उपयोग आवश्यक आहे. खारलेल्या मांसापेक्षां डब्यांतील अन्न कमी हानिकारक आहे. परंतु असल्या अन्नाबरोबर थोडें ताजें प्राणिज किंवा उद्भिज अन्न खाल्याशिवाय आरोग्य टिकणार नाहीं.