पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ आरोग्यशास्त्र डब्यांत भरावयाचें अन्न तर ताजें व हितावह पाहिजेच. परंतु ज्या डब्यांत तें भरावयाचें त्या डब्याच्या घटनेत हानिकारक द्रव्यें असतां उपयोगी नाहींत. डब्यांना कथलाची कलई सर्वांगावर करावी. सूक्ष्मदर्शक कांचेने पाहतां त्यांत कोठेंहि उणीव दिसूं नये. कारण अशाने लोखंड गंजतें. कल्हईचे कथिलांत शिशाचे प्रमाण शेकडा १ पेक्षां अधिक नसावें. झाळण्याच्या कथिलांत शिशाचा भाग शेकडा १० च्या वर नसावा. ज्या डब्यांत शिरका वगैरे आम्ल द्रव्यांनी युक्त पदार्थ ठेवावयाचे असतात त्यांच्या आंतील अंगास लॅकर्ड (Lacquered ) लावावें, डबे भरण्याची तारीख घालण्याची सक्ती ठेवणें फार हिताचें होईल. खाद्य डबा भरण्याची रीत थोडक्यांत खाली दिली आहे :- अन्न, वगैरे डब्यांत भरून झांकण घालतात. झांकणाच्या बहुधा मध्यावर अस- णारें हवा जाणारें लहान छिद्र नंतर झाळतात. हा डबा पुढें ११५ अंशांच्या वाफेच्या रिटॉर्टमध्ये कॅल्शियम् क्लोरेडच्या उकळत्या द्रावणांत १-२ तास ठेवतात किंवा उकळत्या निवळ पाण्यांत चार तास ठेवतात. नंतर टिन बाहेर काढून छिद्रावरील झाळ लालभडक तप्त लोखंडानें वितळून दूर सारतात. म्हणजे डब्यामध्यें फैलावलेले वायू बाहेर निघून जातात. नंतर तें छिद्र पुन्हा बंद करतात. तो डबा पुनरपि वार्फेत किंवा उकळत्या द्रावणांत निम्मा वेळ ठेवतात. असल्या डब्यांच्या दोन्ही बाजू अति दबलेल्या असतात; व त्यांवर प्रहार केल्यानें बदबद नाद निघतो. वरील कृतींत न्यूनता पडल्यास आंतील पदार्थ बिघडतो. तो कुजण्या- पासून होणाऱ्या वायूमुळे दोन बाजू प्रथम सपाट व पुढें फुगीर होतात. त्यावर ठोकल्यानें नगाऱ्यासारखा आवाज निघतो. बिघडलेल्या डब्यांची परीक्षा करणें सोपें आहे. परंतु कधीं कधीं बिघडलेल्या डब्यास भोकें पाडून आंतील वायू जाऊं देतात व पुन्हां ते बंद करतात.