पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेये व मसाले १५३ क्लेइनचे बॅसिलस स्पॉरोजेनेस नामक जंतूंमुळे डबे फुगीर होतात. ह्यांच्या अंड्यांवर (स्पोअर) उष्णतेचें कार्य होत नाहीं. हे जंतू कोलन- मध्ये असतात. डबे थंड जागी ठेवल्यास अंडीं सुषुप्तावस्थेत असतात. परंतु उष्णमान ३९° सेंटिग्रेडच्या सुमाराइतकें वाढल्यास तीं परिपक्क होऊन मांस कुजतें. डबे जोरानें हालवण्यानें किंवा त्यांतील द्रव पदार्थ गोठण्याने देखील डबे फुगीर होतात. परंतु (कन्डेन्स्ड मिल्क) गोठलेल्या दुधाचे डबे शेवटल्या दोन कारणांन" फुगतात असे समजूं नये, तर दूध गोठवण्याच्या अगोदर उत्पन्न झालेल्या बॅक्टेरिआमुळे निर्माण झालेल्या आम्लाचे कार्य टिनवर होऊन वायूंची उत्पत्ति होते. आंतील भाजीपाल्या- वर विनीगरची अशीच क्रिया होऊन वायूंची उत्पत्ति होते. डब्यांतील पदार्थ कुजूं नयेत व ते अधिक काल टिकावेत म्हणून त्यांत कोथ- प्रतिबंधक पदार्थ घालण्यांत येतात. हे सौम्य प्रमाणांत घातल्यास समजण्यासारखा अपाय होत नाहीं, एन्हवीं ह्यापासून नुकसान होतें. डब्यांतील पदार्थ कुजल्यानें किंवा जोराने हाताळल्यानेंहि डबा फुगतो. फुगवटी पदार्थ नासल्यानें आली कीं काय हें पाहाण्यासाठी फुगीर भागावर पाण्याचा बिंदु सोडावा व त्या बिंदूमधून डब्याला भोंक पाडावें. आंतील पदार्थ सडले असल्यास बरीक बुडबुडे पाण्यांतून बाहेर पडतील, व आंतील जिन्नस निर्विकार असल्यास पाणी आंत शोषलें जाईल. डबा बिघडल्यास आंतील जिनसांचा वर्ण पालटतो. डब्याचा पत्रा उद्भिज रसा- दिकांनी बिघडतो. त्यास स्लेटीसारखा रंग येतो. अशी अवस्था कित्येक वेळां खाद्य डब्यांत भरण्यापूर्वी त्यांत टोमेन्सची उत्पत्ति झाल्याने होते. सोमल, तांत्रें व जस्त ह्यांचा अंश कचित् वेळीं आंतील द्रवांत सांपडतो. तेलें किंवा आम्ल ह्यांनीं धातूचे डब्यांचे आंतील पदार्थात फेरफार होतात. ह्यांनी धातूचें द्रावण होते. झाळ, वार्निश व एनॅमेल ह्यांपासून शिशाचा प्रवेश अन्नांत होतो. झळाचा स्पर्श अन्नाला बिलकुल होऊं