पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ आरोग्यशास्त्र देऊ नये. पंचमध्यें दाबून किंवा ठशावर घडून डबा तयार करावा व वरील झांकण चिमट्यानें दाबून बसतें करावें. रासायनिक रक्षकांचा ( Preservatives ) उपयोग केला असल्यास असें समजावें कीं, मांसादि पदार्थ डब्यांत घालण्यापूर्वी त्यांत कांहीं दोष असावा व त्याच्या प्रतिकारार्थ रक्षकांचा उपयोग केला गेला. हॅम अथवा बेकन हीं थोड्या बोरॅक्समध्ये गुंडाळलीं तरी चालतील. त्याचा प्रवेश चरबींत फारच थोडा होता, परंतु अन्य त्वचांमध्ये फार होतो. डबे, बाटल्या ह्यांतील खाद्य पदार्थांच्या वापरण्याविषयीं कांहीं सामान्य व व्यवहारांतल्या सूचना खाली दिल्या आहेत. ( १ ) स्वस्ता माल वापरूं नये. ( २ ) त्यावर कारखानदाराचें नांव असावें . ( ३ ) बाहेरला डबा भिकार असल्यास आंतला माल बहुधा चांगला नसतो. ( ४ ) मुख्यांत बहुधा धातूंचा अंश उतरतो, म्हणून बाटल्यांत असले तरच ते वापरावेत ( ५ ) मांस अथवा मासा ह्यांचा रंग व काठिण्य कायम असावीत ( ६ ) डबा उघडल्या दिवशींच तो संपवावा. हिंदी लोकांचे मसालेः- हिंदी लोक जे मसाले वापरतात त्यांपासून अन्नाची रुचि पुष्कळ वाढते. इतकेंच नव्हे तर, अन्नपचनास मोठें सहाय्य होतें. आयुर्वेदापैकी पुष्कळ भाग पाश्चिमात्यांनी घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणें मसाले वापरण्यांत त्यांनी हिंदी लोकांचें अनुकरण केल्यास त्यांचा मोठा फायदा होईल. हिंग, जिरें, दालचिनी, तमालपत्र, लवंग, धने, हे पदार्थ रुचिप्रद, पाचक, वायुहर, अग्निदीपक व उत्ते- जक ( स्टिम्युलंट) आहेत. मेथ्या व कारळे ह्रीं फोडणीस घालण्याची चाल चांगली आहे. कांदा पौष्टिक, स्कर्वीनाशक, रुचिप्रद आहे. लसूण त्यापेक्षां चांगली असून पोटांतील वायु व सांध्यांतील वायु ह्यांवर उत्तम आहे.