पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें 1 स्पर्शसंचार (काँटेोजअन् ) व स्पर्शसंचारी (काँटेजिअस् ) विकार स्पर्शसंचार

रोग्याच्या शरिराला किंवा त्याच्या शरिराच्या द्वारा निघालेली लाळ, कफ इत्यादि पदार्थांना प्रत्यक्ष स्पर्श झाल्यानें रोग दुसऱ्यामध्ये शिरणें ह्यास स्पर्शसंचार (कांटेजन ) म्हणतात व अशा रीतीनें पसरणाऱ्या रोगास स्पर्शसंचारी ( कांटेजिअस ) रोग म्हणतात. कांहीं रोगांतील जंतूंचा प्रसार रोग्याचे कपडे इत्यादींच्या द्वारा किंवा हवेने देखील दुसऱ्या निरोगी मनुष्याच्या अंगी होणें ह्यास वातसंचार ( इन्फेक्शन् ) म्हणतात. व असल्या मार्गानें पसरणाऱ्या रोगास वातसंचारी (इन्फेक्शि - अस् ) रोग म्हणतात. स्पर्शसंचारी हा शब्द वातसंचारी रोगांना देखील लावतात. कांहीं आजार मनुष्यांपासून पशूंना व उलट पशूंपासून मनुष्यांना होतात. रोगजनक सूक्ष्म जंतूंची माहिती जंतुशास्त्रांत असते. हे जंतू सजीव सूक्ष्म कण असून शरिराच्या बाहेर व आंत बहुतेकांशी स्वतंत्र रीतीनें जिवंत राहू शकतात. ह्या वर्गात कनिष्ठ व अत्यंत अपूर्ण उद्भिज जीवांचा समावेश होतो. प्राणी व वनस्पति ह्यांमध्ये हा एक दुवाच म्हटला तरी चालेल. ह्या वर्गांत बॅसिलि, मेक्रोकी, स्फिरिली इत्यादींचा समावेश होतो. हे जंतू पृथ्वीवर सर्वत्र सांपडतात. वातसंचारी विकारांत जंतूंच्या प्रवेशानंतर प्रत्यक्ष रोगाच्या भावना उत्पन्न होईपर्यंत कांहीं काल लोटतो, त्यास मुग्धावस्था ( Latent period) म्हणतात. आंत शिरलेल्या जंतूंचा नाश करण्यासाठीं शरिरांत विषेश क्रिया असतात. म्हणून असल्या रोगांत ज्वर येतो. जंतूंचा परिणाम रक्तावर कांहीं महिने किंवा यावज्जीव