पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १५७ राहतो, म्हणून एकदां घडलेला वातसंचारी रोग पुन्हां कांहीं महिने किंवा जन्मभर होत नाहीं. उदाहरण: - गोवर, डांग्या खोकला इत्यादि. ह्या द्रव्याचा परिणाम मुख्यतः शरिराचें कातडें, मुख, जठर, आंतडीं, नाक व फुप्फुसें ह्यांवर होतो. तेथेंच त्यांची वाढ होते व त्या ठिकाणीं उत्पन्न होणारी लाळ, कफ इत्यादि सावांतून ते बहुतेकांशी बाहेर पडतात. बाहेर आल्यावर ह्या जंतूंचा साक्षात् प्रसार निरोगी मनुष्यांमध्ये होतो. किंवा ते रोग्यांच्या कपड्यांत अथवा जवळच्या सामानांत निद्रावस्थेत कांहीं काल राहतात व त्यांचा संचारी धर्महि कांहीं काल टिकतो. अशा जंतूंचा प्रसार प्रत्यक्ष स्पर्शानें व कपडे आणि सामानसुमानाच्या द्वारांदेखील होतो. अशा रीतीनें पसरणाऱ्या रोगांना " वातसंचारी रोग " असें म्हणतात. कांहीं रोगांतील संचारी द्रव्यें शरिराच्या बाहेर पडल्यावर अल्पकालांत नाश पावतात. अशा प्रकारांत रोग्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शानें दुसऱ्यांना रोग होतो. असल्या रोगांना 'स्पर्शसंचारी रोग' असें म्हणतात. देवी, गोवर इत्यादि स्फोट ( फोड )कारी ज्वरांच्या सांथी नियमित कालानें येतात. ह्यांचा स्पर्शसंचार हवेच्या द्वारां होतो म्हणून ते लवकर पसरतात. कांहीं रोग स्थानिक म्हणजे एकाद्या देशांत किंवा प्रांतांत मात्र असतात व कांहीं जंतूंत किंवा अनुकूल परिस्थिति प्राप्त झाल्यावर हे तुरळक आजार सांथीत रूपान्तर पावतात. उदाहरणः - विषूचिका ( कॉलरा ). खालीं लिहिलेले रोग पशू व मानव ह्या दोहोंमध्यें सामान्यत्वें होतातः- क्षय, ग्रंथिक सन्निपात (प्लेग), धनुर्वात, धावरें, घशाचा डिफ्थेरिओ रोग इ. प्लेग प्रथम उंदरांना होतो, व त्याच्या अंगावरील पिसवा त्याचें जंतूंनीं भरलेले रक्त पितात आणि ह्या पिसवा मनुष्यास चावल्यानें त्यांच्यामध्ये शिरलेल्या जंतूंचा प्रवेश मनुष्याच्या कातड्यांत होतो. म्हणून उंदीर व पिसवांचा संहार केल्याने प्लेगाची सांथ येत नाहीं. क्षयरोगांत क्षयग्रंथी