पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८ आरोग्यशास्त्र ( ट्युबर्कल) नामक सूक्ष्म गांठी उत्पन्न होतात. ह्यांमध्यें क्षयजंतू (बॅसिलस ट्युबर्क्युलोस ) असतात. क्षयग्रंथी हा बहुधा फुप्फुसांत होता व तेव्हां त्या रोगास कफक्षय असें म्हणतात. पण तो आंतड्यांत झाल्याने फक्त रेचच होतात. ते सामान्य उपायांनी थांबत नाहींत. त्यांची परीक्षा लवकर होत नाही, म्हणून आंतड्यांत देखील क्षयग्रंथी उद्भवतात. हें सर्वांनीं, विशेषेकरून वैद्यांनी नीट लक्षांत ठेवावें. इकडे लक्ष न पोचल्यानें हजारों लोक मृत्युमुखी पडतात. क्षयजंतू क्षयरोग्याच्या थुंकींत, कफांत व मलांत सांपडतात. क्षयानें मेलेल्या लोकांपैकीं शेंकडा पंचवीस मनुष्यां- मध्यें सांपडणारे जंतू गाईंतील क्षयजंतू असतात असें मरणोत्तर परीक्षेत आढळते. ह्यावरून गाईच्या दुधांतून क्षयजंतूंचा प्रसार होतो हें चांगलें ध्यानांत ठेविलें पाहिजे. ह्यासाठीं सदृढ जनावरांचे दूध प्यायें, रोगट जनावरांचें पिऊं नये. कांहीं जनावरें प्रसूत होईपर्यंत दूध देतात, म्हणून त्यांना चांगलीं असें मानतात. परंतु फार काल दूध काढीत राहिल्यानें असल्या जनावरांना क्षयरोग होतो. म्हणून त्यांचें दूध पिणें धोक्याचें असतें. ज्यांच्या वशांत क्षय नाहीं, ज्यांची प्रकृती चांगली सदृढ असते, अशा लोकांना क्षय झालेला कित्येक वेळां पहाण्यांत येतो व त्याचें कारण पुष्कळ वेळां दूषित दूध हें असतें. प्रत्यक्ष दुधांत जंतू नसतात तर इतर ठिकाणांप्रमाणे जनावरांच्या स्तनांवर क्षयग्रंथी येतात. तेव्हां स्तन खड- बडीत लागतात. धार काढतांना ह्या ग्रंथीतील जंतू दुधांत उतरतात. असलें दूध प्याल्यानें मनुष्याला बहुधा क्षय होतो. म्हणून कोणतेंहि दूध उतू येऊ लागेपर्यंत खरपूस तापवावें व नंतर प्यावे. धारोष्ण म्हणजे ताजें काढलेले दूध न तापवितां तसेंच पिणें चांगलें अशी समजूत आहे. परंतु ज्या जनावरांचें असलें दूध प्यावयाचें तीं सुदृढ व स्वच्छ असलीं पाहिजेत. त्यांचे स्तन गुळगुळीत व स्वच्छ असावेत, व गोठेहि साफ- सूफ व निर्मळ असले पाहिजेत. असें नसल्यास धारोष्ण दूध पिऊं नये.