पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १५९ टैफाइड सन्निपाताचें व विषूचिकेचें विष त्या आजारांत होणाऱ्या रेचांत असतें. म्हणून त्या आजाराचे मलांतील जंतूंचा नाश जंतुनाशक द्रव्यांनी किंवा मळ जाळण्याने करावा. ग्रंथिक सन्निपात (प्लेग ) :- ह्या आजारांतील रोगजनक जंतूंचा प्रसार पिसवांच्या द्वारा होतो. हें रक्त शोषणारे जीव रोगी प्राण्यांतील जंतू निरोगी मनुष्यांच्या अंगांत थेट प्रत्यक्ष पोचवतात. हिवताप डासांच्या द्वारां पसरतो हें प्रसिद्धच आहे. कांहीं आजार स्थानिक प्रकारचे असतात. त्यांत जंतूंची उत्पत्ति मर्यादित जागेंत होते; व नंतर जंतूंपासून उत्पन्न झालेला विषार सर्व शरीरभर पसरतो व रोग बळावतो. घशांत होणारा डिफ्थेरिया व किर- कोळ देखील जखमांनीं होणारा धनुर्वात ह्यांमध्ये रोग मर्यादित जागेंत होतो, म्हणून ऐन सुरवातीला व त्या जंतूंचा विषार शरिरांत पसरण्याच्या अगोदर त्या त्या आजारावरल्या दोन महिन्यांच्या आंत तयार केलेल्या ताज्या सिरमची पिचकारी ( इंजेक्शन) त्वचेंत मारली तर ह्या भयंकर रोगांत पुष्कळ वेळां गुण येतो. सर्व देहांत किंवा रक्तांत प्रथमपासून पसरणाऱ्या जंतूंपासून होणाऱ्या रोगाच्या भावना देखील त्यांच्या जंतूंपासून होत नसून, त्यांच्या जंतूंपासून उत्पन्न होणाऱ्या विषापासून होतात. स्पर्शसंचारी रोग न होऊं देण्यास उपाय आहेत व ते योजण्याची गोडी सुशिक्षितांनी आपल्या लोकांना लाविली पाहिजे. जो आजार आपल्याला होऊं नये असें वाटत असेल त्या आजाराच्या मंद केलेल्या जंतूंचा प्रवेश जना - वरांच्या रक्तांत करतात. अशा जनावरांचें रक्तोदक मनुष्याच्या त्वचेंत सोडल्यानें त्या रोगांपासून कांहीं कालपर्यंत बचाव होतो. वातसंचारी रोग झाल्यावर देखील त्या त्या रोगासाठी तयार केलेल्या रक्तोदकाची