पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० आरोग्यशास्त्र ( सिरमची ) पिचकारी शरिरांत सोडल्यानें गुण येतो. मर्यादित जागेंत प्रवेश होणाऱ्या रोगांत गुण फार येतो हें वर लिहिलें आहे. उपदंशा- मध्यें इंजेक्शनमुळे चांगला गुण येतो. स्पर्शसंचारी रोग मसूरिका (देवी) व देवी टोचणें मसूरिकेची मुग्धावस्था बहुतेक सर्वदा १२ दिवस असते. क्वचित् ९ पासून १५ वे दिवसांपर्यंतही असते. प्रत्यक्ष लशीचा प्रवेश केल्यावरच मुग्धावस्था फक्त ७ किंवा ८ दिवस असते. वेरिओला नैग्राची फल ६ ते ७ दिवस असते. बहुधा अगदी आरंभींच्या भावनांपासून हा रोग पसरतो; व संसर्गकारी धर्म ३ ते ४ आठवडे टिकतो. रोग्याचें मुख व कंठ ह्यांतील द्रव रस व त्वचेवरील स्फोट ह्यांमध्ये विष असतें. त्वचेचा वाळलेला कोंडा, स्फोटांतील पुवाचे वाळलेले आशय ह्यांच्या द्वारा हवेने हें विप लांबपर्यंत पसरतें. मसूरिकेच्या आतुरालयाच्या आसपास दा आजार अधिक पसरण्याचें कारण वायु असावा, असे कित्येकांचें मत आहे. कपडे, अंथरूण पांघरूण, सामानसुमान ह्यांना मसूरिकेचें विष जोरानें चिकटतें, वह्या पदार्थांच्या द्वारा रोग वरचेवर पसरतो. विशिष्ट प्रकारच्या इतर अनेक सांसर्गिक रोगांप्रमाणें मसूरिका पसर- ण्याचा विशेष ऋतु आहे. ह्या रोगापासून वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मृत्युसंख्या ज्यास्त असते. मे महिन्यांत ती सर्वांत अधिक असते व जून महिनाभर कमीकमी होत जाते. मसूरिका कटिबंधांत व सर्व मानव वंशांत सारखी पसरते. ही सर्व वयांत व स्त्रीपुरुषांत सारखीच उत्पन्न होते. पूर्वीच्या आजाऱ्याच्या विषाच्या संसर्गाशिवाय नवीन रोगी होणार नाहीं; अन्य सांसर्गिक रोगांप्रमाणे या रोगाचें विष गर्दीच्या व अस्वच्छ घरांत व घाणेरड्या