पान:आरोग्यशास्त्र.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १६१ टांंत अधिक जलाल होतें. सांथीमध्यें देवी काढलेल्या लोकांना होणाऱ्या सौम्य रोगांकडे दुर्लक्ष झाल्यानें व चिकन पॉक्सची पारख न झाल्यानें मसूरिकेचा फैलाव होतो. अशा सौम्य रोग्याच्या विषापासून देवी न काढलेल्या लोकांमध्यें जहरी मसूरिका होण्याचा संभव असतो. असाच प्रकार अन्य सांसर्गिक रोगांच्या सांथींसंबंधाने घडतो. जेनरनें गोमसूरिका टोंचणें (वॅक्सिनेशन् ) ह्याचा शोध १७९८ मध्ये लावण्यापूर्वी मसूरिका हा रोजचा आजार होता. १७५०-१८०० सालापर्यंत सर्व रोगांच्या मृत्युसंख्येपैकी मृत्यु फक्त मसूरिकेनें होत असत. ह्या रोगाची भयंकर मृत्युसंख्या व अंधत्व ह्यांच्यामुळे कॉन्स्टॅटिनोपल येथील मसूरिकेची लस टोचण्याची चाल लेडी मेरी माँटेग हिने इंग्लंडांत सुरू केली व ती अठराव्या शतकाच्या उत्तर भागांत चालू होती. मसूरिकेनें मृत्युसंख्येचें प्रमाण शेकडा २० ते ३० असें तें मसूरिकेच्या लशीनें २ ते ३ वर आले परंतु ह्या टोचण्याने रोगाचा स्पर्शसंचार फारच फैलावला व सांथी वरचेवर उद्भवूं लागल्या. जेनरनें आपले शोध १७९८ मध्ये प्रसिद्ध केले. तेव्हांपासून देवी काढण्याची चाल सृष्टीमध्ये चोहोंकडे पसरली. सांथी अधिक अवकाशानें होऊं लागल्या. रोगाची तीव्रता, जनतेवर त्याचे दुष्परिणाम व मृत्यु - संख्येचे प्रमाण कमी कमी होत गेलें. १८३८ मध्ये देवी टोचणें मोफत केलें गेलें. १८५४ मध्ये ३ महिन्यांच्या वरील मुलांस तें सक्तीचें झालें. १८७१ मध्यें पालक मंडळीना आपआपल्या भागाला सार्वजनिक देवीडॉक्टर नेमण्याची सक्ती झाली. इंग्लंड व वेल्समध्ये १८३८ पासून १८५३ सालामध्ये १००० वस्तीला मसूरिकेपासून वार्षिक मृत्युसंख्या • ४२ होती. ती गेल्या वीस वर्षांत ०.०२ झाली. १८ व्या शतकांत ११