पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणी बॅसिलस टैफोसिस व दुसरे रोगजनक जंतु यांचा नाश करणे अधिक महत्त्वाचे आहे. पाण्यांतील इतर प्राणिज अंशांचा क्षय झाला तरी हे जंतु पाण्यांत असू शकतात व कधी कधी तर इतके असतात की, त्यांचे पासून स्पर्शसंचारी विकार होतात. आंतस्थ इत्यादि बॅसिली पाण्यांत पडल्यावर काही कालाने निर्जीव होऊन त्यांचेमधील रोगजनक शक्ति नष्ट होते. पाण्याचे मानाने त्यांत शिरणाऱ्या मलाचे प्रमाण अधिक असल्यास प्राणवायूशी संयोग बंद पडतो. जलांतील प्राणवायु कमी होतो. त्यांतील मत्स्यादि प्राणी व क्षुद्र वनस्पती तदभावे नाश पावतात. प्राणिज पदार्थ कुजून फेसाळतात. दुगंध वायु उत्पन्न होतात. नदीतळी दुर्गंधयुक्त सडणारे पदार्थ बसतात. हे पदार्थ वर खाली होतात. यामुळे मोठा उप- द्रव होतो. ह्या सर्व क्रियांचा परिणाम शुद्धिकरण हा असतो. परंतु तें घडेपर्यंत हानिकारक दुष्परिणाम भोगावे लागतात. नदीचें जल थंड असल्यास निर्मलिनीकरण चालू राहाते. परंतु तें जल तापल्यास हे बंद पडतें, बॅक्टोरिआंची वाढ होते व सडण्याचे क्रियेला आरंभ होतो. विचिका, आंत्रसन्निपात (टैफाइड), अतिसार, आमांश, इत्यादि विकारांतील जंतु मलद्वारा नदीत पसरून ह्या रोगांच्या साथी उत्पन्न होऊन ते फैलावतात हे आपण नित्य पाहातो. लंडन शहरांतील पाण्याचे चौकशीकरितां बसविलेल्या रॉयल कमि- शननें खालील सिद्धांत काढले आहेत. टैफाइड, सन्निपात व विषचिका ह्यांचे जंतु पाण्यात ठेवले असतां हीनवीर्य होऊन शेवटी नाहीसे होतात. अन्य जंतुशून्य पाण्यांत हे जंतु सोडले असतां कित्येक आठवडे किंवा महिनेपर्यंत काही अंशाने त्यांची चेतना कायम राहाते. मात्र तेथें जिवंत राहाण्यास त्यांना काही तरी प्राणिज पदार्थ असावे. परंतु सामान्यतः नदीच्या ज्या पाण्यांत रोगोत्पत्ति न करणारे जंतु व वेगानें उत्पन्न होणारे