पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ आरोग्यशास्त्र १००० मृत्युसंख्येत मसूरिकेची मृत्युसंख्या ०१ म्हणजे १०० असे. हें प्रमाण उतरत हल्ली ००१ म्हणजे एक हजारमध्ये १० झालें आहे. एकदां देवी काढल्यावर १५ व्या वर्षी त्याचा रोगप्रतिबंधक गुण कमी होतो. एकदां देवी काढल्यावर पुन्हां काढाव्या लागत नाहींत असा समज असतो; परंतु तो बरोबर नाहीं. निदान तान्हेपणी काढलेल्या देवींसंबंधानें हें विधान चूक आहे. देवी टोचणें यशस्वी होणें हें शस्त्र- क्रियेचें कौशल्य, वणांची संख्या व खोली ह्यांवर अवलंबून आहे. टोंचल्याचा परिणाम कालगतीनें कमी होतो. शेवटीं यौवनावस्थेच्या सुमारास देवी टोचणें आवश्यक होतें. मुलाच्या काढलेल्या देवींच्या आठव्या दिवसाच्या वेसिकलमधील लिंफाचा गोस्तन मसूरिकेच्या लिंफाइतका उपयोग होतो, व त्यापासून वासरांच्या फोलशीइतकी निर्भयता बहुधा येते. देवी काढलेल्यांत व न काढलेल्यांत होणाऱ्या देवींचें प्रमाण व तीव्रता ह्यांच्या मानावरून देवी काढण्याच्या उपयुक्ततेचें व निर्भयतेचें अनुमान काढितां येतें. देवी न काढलेल्यांच्या संख्येचे आकडे उपलब्ध नाहींत. परंतु अदमासें लोकसंख्येच्या एकदशांश असावे. आतुरालयांतील मसूरिकेच्या रोग्यांपैकीं शेंकडा ३० रोगी देवी न काढलेल्यापैकीं असतात व ह्यांमध्यें रोगाची तीव्रता दृष्टीस पडते. तीन ते बारा महिन्यांपर्यंत प्रथम देवी काढाव्यात. पुढें १० ते १२ वर्षांनंतर पुनरपि लस टोचावी व तिसऱ्या वेळीं २१ व्या वर्षी देवी काढाव्या. देवीच्या रोग्यास स्वतंत्र आतुरालयांत दूर ठेवावें. ताजी स्वच्छ लिंफ घेऊन देवी सफाईनें काढल्यास निराळे त्वग्रोग उत्पन्न होत नाहीत. व्हॅक्सिनेशनमुळें उपदंश, धावरें, अतिसार, गंडमाळा, श्वासनलिकांचा दाइ, वातरक्त व दुसरे त्वग्रोग उद्भवतात.