पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १६३ वासरांचें लिंफ वापरल्यानें उपदंश होणार नाहीं. कारण वासरांना उपदंश होत नसतो. कधीं कधीं सजन्मोय दंश असून तो देवी टोंच- ल्याने झाला असें वाटण्याचा संभव आहे. जडणाऱ्या उपदंशाचे स्फोट फार लवकर आले तर ५० ते ९० दिवसांपर्यंत येतात. अशा व प्रत्येक रोग्यास टोचल्या जागीं चट्टा उद्भवतो. उपदंशाचा चट्टा टोचल्या जागेपैकीं एक अथवा दोन बिंदूंभोंवतीं येतो, दाह अल्प असतो, जखम उथळ असते व त्वचेंत विलक्षण काठिण्य येतें. टोंचण्याच्या कामी अस्वच्छता केल्यानें किंवा टोचल्यांनंतर स्वच्छता न राखल्याने धावरें हा रोग होतो. देवी टोचण्यानें अर्टिकेरिया, एरिथिमा, लेकेन, पर्युरा इत्यादि वस्फोट उद्भवतात. परिशिष्ट व्याधी ( सिक्किली ) म्हणून एक्झीमा, सोरैसिस, पेंफिगस् इ. परिशिष्ट व्याधी ( सिक्किली ) झालेले पहाण्यांत येतात. परंतु लिंफ अशुद्ध किंवा अस्वच्छ असल्यास इंपेटैगी - काँटेजिओसा, घावरें, सेल्युलैटिस, पायेमिआ अथवा स्थानिक को भवन हे विकार कधीं कधीं होतात. उपदंश फार विरळा होतो. ग्लिसेरिन किंवा क्लोरोफॉर्म घातलेल्या वासराचें लिंफ वापरण्याची गव्हर्मेंटची योजना आहे. ह्या पदार्थाचे अंगी लिंफ टिकवून तिला न बिघडवू देण्याचा धर्म, बॅसिलस ट्यूर्बक्युलोसिससारख्या परक्या जंतूंचा नाशक धर्म आहे. ही अंमलांत आल्यानें दंडाच्या लिंफापासून होणारे त्वायोगांची भीति टळेल. देवी काढण्यासाठी घ्यावयाच्या वासरांची निवड करावी लागते. त्यांचा पूर्वेतिहास पहावा. ट्युबर्क्यूलिन द्रव्यानें ट्युबर्क्युलोसिस आहे किंवा नाहीं ह्याची परीक्षा करावी. वासराचे वय, त्याच्या प्रकृतीचें मान व वाढ आणि ऋतु ह्यांचा परिणाम लिंफाच्या गुणावर होतो.