पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ आरोग्यशास्त्र पॅरिसमध्यें लिंफांत बरोबरीनें ग्लिसरिन, व इंग्लंडमध्यें समभाग पाण्यांत मिश्र केलेलें आठपट ग्लिसरिन मिसळतात. क्लोरोफॉर्ममिश्रित लिंफ करावयाची झाल्यास लिंफाच्या इमल्शनमधून क्लोरोफॉर्म व हवा जाऊं देतात. ही लिंफ सतरा दिवसांनी वापराव- यास काढतात. मसूरिका उत्पन्न झाल्यापासून ४८ तासांच्या आंत देवी टोचल्यास मसूरिकेचे स्फोट येत नाहींत; तर टोंचलेल्या जागीं मात्र फोड येतात. मसूरिका उत्पन्न झाल्यापासून तीन दिवसांच्या आंत देवी काढल्यास मसूरिकेच्या भावना सौम्य होतात. पण तदनंतर देवी काढल्यास कांहीं एक उपयोग होत नाहीं. गाईवरील देवी व मानवी मसूरिका दोन्ही एकच रोग आहेत. गाईमध्ये झाल्यानें त्याचें रूप पालटतें इतकेंच. मसूरिकेतील लिंफ वासरांत टोचल्यानें फोड येत नाहीत; परंतु टोचल्यापासून ५०व्या दिवशी एका वासराच्या जखमेंतील द्रव्ये दुसऱ्या वासरांत व त्यांतील तिसऱ्यांत असें करीत गेल्यास ५ व्या वासराला कौपॉक्सप्रमाणें फोड येतात व त्या फोडांतील लशीनें वासरांना त्याचप्रमाणें मनुष्यांना देवी काढल्यासारखे फोड येतात व मनुष्याच्या ह्या फोडांतून घेतलेल्या लशीनें वासरावर देखील कौपॉक्ससारखे फोड येतात. एका गाईपासून दुसन्या गाईला कौपॉक्स होतो. रोगनिर्णय :- गोवर व मसूरिका त्यांचा घोटाळा होतो. कधीं कधीं देवीच्या अगोदर गोवरासारखा हंगामी फुलवरा खऱ्या मसूरिकेच्या पूर्वी येतो. देवीचे फोड, चिकन पॉक्स, ऍक्ने, इंपेटिंगो, एक्झिमा, उपदंश व टैफस ह्यांच्या स्फोटाप्रमाणें दिसतात. खऱ्या आजाराची परीक्षा न झाल्यानें सांथ पसरण्यास मदत होते.