पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १६५ मसूरिका झाल्यास प्रतिबंधक उपाय करावे : - ( १ ) रोग्यास पृथक आतुरालयांत एकीकडे ठेवावें. ( २ ) दूषित खोली, तिच्यांतील सामान, कपडे वगैरे जंतुविरहित करावे. (३) घरांतील अन्य लोकांनी पुन्हां देवी काढाव्या. ( ४ ) रोग्याच्या शेजारी जाणाऱ्या लोकांना १५ दिवस कॉरंटाइनमध्ये ठेवावें, निदान त्यांची रोज तपासणी ठेवावी, ह्मणजे कोणी आजारल्यास त्याला आतुरालयांत पोंचत्रितां येईल. ( ५ ) घरांतील मुलें ज्या शाळेत जात असतील त्यांची नांवें जाहीर करणें . डांग्या खोकला ( व्हूपिंग कॉफ ) हा विशिष्ट प्रकारचा सांसर्गिक रोग आहे. फुप्फुसाबाटें ह्याचें विष बाहेर येतें. ह्यांतील विशिष्ट जंतू निवडून निराळा काढण्यांत आला नाहीं, तथापि बोर्डचा बॅसिलस हा विशिष्ट जंतु असावा. हा हवेमध्यें दूर पसरत नाहीं, परंतु कपड्यांना गच्च चिकटून बसतो. मुग्धावस्था १ ते ३ आठवडे टिकते. व ह्या खोकल्याच्या सुरुवातीपासून निदान सहा आठवडेपर्यंत रोगप्रसारक धर्म रोग्यांत असतो. तान्हीं व लहान मुलें यांत रोगाची पात्रता फार असते. व ह्या आजाराची पाळी थोड- क्यांची चुकते. मुलाचें वय जितकें कमी तितकी मृत्यूची भीति ज्यास्त. ह्याच्या मृत्युसंख्येपैकी शेकडा ४० एक वर्षाचे आंतील मुलांमध्ये होतो. दुसऱ्या वर्षांत ३० आणि तिसऱ्या, चौथ्या व पांचव्या वर्षांत शेंकडा ८ होतो. मुलींमध्ये तीव्र प्रकारचा आजार होतो. प्रौढ वयांत हा आजार होत नाहीं; कारण त्यांना पूर्वी बहुधा हा आजार झालेला असतो; परंतु झाला नसल्यास मुलांप्रमाणें त्यांनाहि होतो. ५ वर्षां- खाली होणाऱ्या रोगांमध्ये डांग्या खोकला हा अत्यंत संहारक आजार आहे. फुप्फुसासंबंधी ( ब्रॉकोन्युमोनिआ ) रोगसंकर होऊन बहुधा मृत्यु येतो. १९१० सालांत १०००ला २०१ ह्या प्रमाणांत त्यांच्या मृत्यूचें प्रमाण होतें व मीजल्सचें १ ९ होतें.