पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ आरोग्यशास्त्र दर पांच वर्षांनीं डांग्या खोकल्याच्या सांथी उद्भवतात. परंतु वसंत- ऋतूंमध्यें तो अधिक असतो. डांग्या खोकला व मीजल्स ह्यांच्या सांथी एके कालीं येतात व दोघांचे प्रतिबंधक उपाय एकच आहेत. गोवर ( मीजल्स ) हा विशिष्ट प्रकारचा सांसर्गिक रोग आहे. ह्याची मुग्धावस्था ९ १२ दिवस असते; परंतु ४ पासून १४ दिवस राहते. नासिक, कंठ, फुप्फुस व आजार बरा होईपर्यंत कदाचित् रोग्याचे त्वचेंतून निघणाऱ्या खावाचे द्वारां स्पर्शसंचार फैलावतो. स्फोटाच्या पूर्वीची पडशाची अवस्था विशेष स्पर्शसंचारी असते; व ह्या काळीं ह्या रोगाची परीक्षा होणें अवघड असतें. मीजल्स हा आजार तान्हेपण व बालपणाचा आहे. लहान मुलांना हा फार घातुक आहे. फुप्फुसासंबंधीं कॉप्लिकेशन व दुसरे संकीर्ण व्याधी हे ह्याचें परिणामाचें प्रायः कारण आहे. प्रौढ इसमांना देखील हा आजार होतो. हा एकदां झालेल्यांना पुन्हां होत नाहीं. ह्या आजाराच्या पाळींतून फारच थोडीं मुलें सुटतात. तीन वर्षांच्या खालीं मीजल्सपासून मृत्यूचें प्रमाण अत्यंत असतें. दुसऱ्या वर्षी मृत्यूचें प्रमाण त्यांत अधिक असतें. पांच वर्षांच्या पुढें हें फार कमी होते. शेकडा ९० मृत्यु ५ वर्षांच्या खालील रोग्यांत होतात. हा स्त्रीपुरुषांना सारखाच होतो. गर्दीची वस्ती व रोगट परिस्थितीचा मृत्युसंख्येवर मोठा परिणाम होतो. गरिबांच्या गर्दी असलेल्या घरांतील अपुरें अन्न खाणाऱ्या मुलांपैकी शेकडा २० ते ३० मृत्यु पावतात. व शेकण्या-खाण्याची व्यवस्था ठेवण्यांत कसूर झाल्यास ह्याहीपेक्षां हैं प्रमाण ज्यास्त होतें. हिवाळ्याच्या ऋतूंत मीजल्स जारीने सुरू असतो. पण वसंतांत तो