पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १६७ अधिक होतो. रोगोन्मुख मुलींचा भरणा झाल्यावर दोन किंवा तीन वर्षांनी मील्जसच्या सांथी शहरांत येतात. प्रतिबंधक उपाय रोगी मुलांना आतुरालयांत वेगळे ठेवावे. त्यांना शाळेत येऊ देऊ नये. घरांत राहिल्यास त्यांना पृथक् ठेवावें. हा आजार हलका न समजतां त्याची काळजी घेण्याबद्दल जनतेला बजावलें पाहिजे. रूथ्लेन रुबेल्ला – अथवा जर्मन मीजल्स - हा विशिष्ट प्रकारचा सांसर्गिक विकार आहे. ह्याचें विशिष्ट प्रकारचें सांसर्गिक द्रव्य आहे. सामान्यतः ह्याची मुग्धावस्था १४ ते १८ दिवस असते; परंतु, एका आठवड्यापासून तीन आठवड्यांपर्यंतही लांबते. रोगाची मुदत ७ ते १४ दिवस असते व ह्या सर्व मुदतींत रोग्यापासून स्पर्शसंचार पसरतो. हा आजार विरळा होतो व बहुतेक सर्वदा सौम्य स्वरूपाचा असतो. मुलें व आरंभींच्या यौवनावस्थेतील मनुष्यें अतिशय रोगोन्मुख असतात. वेरिसेल्ला (Varicella ) मसूरिकेचा सौम्य प्रकार म्हणून हा आजार वरचेवर समजला जातो. परंतु ( ह्या दोन्हींमध्ये स्पष्ट भेद आहे ) हे दोन्ही अगदीं भिन्न आहेत. हा रोग अगदीं सौम्य आहे; व दुसरे रोगसंकर नसल्यास क्वचित्च मारक होतो. मुग्धावस्था १३ ते १९ दिवस असते; सामान्यत: चौदा दिवस असते. वेरिसेल्लाचा संसर्ग प्रथमपासून फार जोराचा असतो. व फोमैट्स Fometes मध्यें कित्येक दिवस सबल राहू शकेल. सर्व खपल्या झडून जाईपर्यंत रोग्याला एकांत स्थळीं ठेवावें. गालगुंडे ( Mumps ) पुष्कळ वेळां थंड व सर्द हवेंत गालगुंडाची सांथ उद्भवते. ह्याचा स्पर्शसंचार फार जलदी पसरतो. परंतु, मृत्यु फार क्वचित् येतो. या