पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ आरोग्यशास्त्र सांथीबरोबर कधीकधीं मीजल्सची सांथ येते. या रोगाचें कारण कांहीं एक माहीत नाहीं. परंतु तें मैक्रोबसंबंधीं असावें. मुखांतील स्टीनच्या नळाचे द्वारा जंतू पॅरॅरोटीड नामक पिंडांत शिरत असावे. एकदा झाल्यावर हा रोग त्याच इसमास पुन्हां होत नाहीं. हा आजार बाल्यावस्थेत मुख्यतः होतो. ह्याची मुग्धावस्था बहुधा तीन आठवडे असते. परंतु चवदा दिवसांपासून पंचवीस दिवसांपर्यंत कमी ज्यास्त होते. पॅरॉटिड व सब- मॅक्सिलरी पिंडाची सूज सुमारें एक पंधरवडा राहाते. कधीं कधीं पंचविशीच्या आंतील तरुण मनुष्यांत ही साथ पसरते, व भयंकर रोगसंकर बहुधा होऊन बधिरता इत्यादि दुष्परिणाम होतात. घटसर्प (डिप्थेरिआ ) डिप्थेरिआची मुग्धावस्था बहुतेक चार दिवसांची असते. दोन दिवसां- पेक्षां कमी व सात दिवसांपेक्षां जास्त नसते. ह्या आजाराचें कारण अजून कांहीं अंशीं अस्पष्ट आहे. रोग्यापासून निरोगी माणसाला संचारी द्रव्य जाऊन पोहोंचतें. तरी पूर्वीचा रोगी नसतांना देखील खेड्यांतून ह्या रोगाच्या सांथी उद्भवतात. कदाचित् डिप्थेरिआच्या संचारी द्रव्याच्या अंगीं पुष्कळ काळपर्यंत सुषुप्तावस्थेत राहून विशेष परिस्थितीत जागृत होण्याची शक्ति असेल. व टैफॉइड ज्वराप्रमाणें सौम्य व परीक्षा न झालेल्या रोग्यांच्या व " विलंबी " रोगवाहकांच्या मुळे ह्याची उत्पत्ति दुर्बोध असूं शकेल. अशा प्रकारांत डिप्थेरिआचे Klebs-Loeffter बॅसिलस निरोगी मनुष्याच्या मुखामध्यें सौम्य अवस्थेत असतात व घसा आला किंवा मेंडक्या सुजल्यावर ते जंतू जहरी होऊन डिप्थेरिआ उत्पन्न करीत असतील हें संभवनीय आहे. निरोगी दिसणाऱ्या लोकांचे व डिप्थेरिआपासून रोगमुक्त मनुष्याच्या घशांत (Pseudo-diptheria bacillus ) तोतया, (खोटे) स्यूडो डिप्थे-