पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १६९ रिआ बॅसिल्स असल्याचें पुष्कळ शोधकांनीं वर्णन केलें आहे. खऱ्या वह्या बॅसिलसूची घटना एका जातीची आहे. मुख, नासिका व कंठ ह्यांतील रसामधून डिप्थेरिआचे जंतू बाहेर पडतात व हवेंत लांबवर पसरत नसले तरी संसर्ग झालेल्या सामानाला व कपड्याला व बिछान्याला गाढा चिकटून बसतात. दुसऱ्या कांहीं संचारी रोगांप्रमाणें ह्या आजाराकडे कित्येक कुटुंबांचा कल असतो. कांहीं ऋतूंत हा ज्यास्त पसरतो व अधिक घातुक असतो. सांथी प्रायः सप्टेंबरांत सुरू होतात. ऑक्टोबर व नोव्हेंबरांत त्यांचा भर असतो. नंतर पुढील दोन महिन्यांत त्या हळुहळू कमी होतात. मेपासून जुलै- पर्यंत मृत्युसंख्येचें प्रमाण फार कमी असतें. स्त्रियांत मृत्युसंख्येचें मान कांहीं ज्यास्त असतें. रोगी मुलांना सांभाळण्याचें काम त्यांच्यावर पडल्यानें हा फरक बहुधा असावा. कांहीं जागीं हा आजार स्थानिक व तुरळक असतो. मधून मधून त्याच्या सांथी त्याच टांपूत पसरतात. ज्या भागांत भूष्पृष्ठ थंड व सर्द असतें व घरें दमट असतात व बहुतेक शौचकूप व मोऱ्या घाणेरड्या असतात व ज्या भागीं थंड व सर्द वाऱ्याचा प्रवाह येत असेल अशा भागांत हा आजार विशेष असतो. पर्जन्य कमी असलेल्या वर्षी याची सांथ फार पसरते व तीन चार वर्षे सतत अवर्षण झाल्यास याची सांथ अधिक जोराची होते. डिप्थेरिआ शहरांत व खेड्यांत सारखाच उद्भवतो. वयाचे दोन *पासून १२ व्या वर्षापर्यंत हा रोग विशेषतः होता. पुढे वाढत्या वयांत याचें मान कमी कमी होतें. मूल जितके अल्पवयी असतें तितकी मृत्यूची भीति ज्यास्त असते. अँटिटॉक्सिनचा उपयोग करण्यापूर्वी या रोगांपासून शेंकडों माणसें दगावत असत. अँटिटॉक्सिन वापरूं लागल्या- वर हीं शेकडा नऊ झालीं व पहिल्या दिवशीं दिल्यास शेंकडा तीन असतें.