पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० आरोग्यशास्त्र डिप्थेरिआचा संसर्ग बहुधा शाळेमध्यें विशेषेकरून होतो. डिप्थे -- रिआची साथ सुरू असतांना अन्य प्रकारचे घशाचे रोग सुरू असतात व गोवर इत्यादि रोगांत घसा सहसा बिघडला किंवा ओलसर जागा, मोऱ्यांचा निकाल नीट नसणें इत्यादि कारणांनी घसा किंवा मेंडक्या सुजल्या तर डिप्थेरिआच्या जंतूंचा प्रवेश होऊन होण्याचा संभव आहे. डिप्थेरिआ रोग डिप्थेरिआचे जंतू हवेंत मंद होतात, परंतु दाट वस्तींत ह्याच कारणांनी पसरतात व आरोग्यनाशक स्थितीच्या भागांत राहणाऱ्या लोकांचे घशांत व स्ट्रेटोकोकै व भिजल्स इत्यादि जंतूंमुळे क्षीण झालेल्या घशांत वस्ती करून राहतात. डिप्थेरिआची सांथ सुरूं असतांना कबुतरें, कोंबडी व दुसरे पक्षी यांचे घशांत मानवी डिफ्थेरिआप्रमाणें विकार होतो. बॅसिलस डिप्थे. रिआच्या लावगडीपैकीं द्रव मांजराच्या त्वचेखालीं सोडल्यास डिप्थेरिआ- प्रमाणें भावना होतात असें लेईन लिहितात. दुधाच्या मार्गानें डिप्थेरिआ पसरतो असें पुष्कळ वेळां सिद्ध झालें आहे. परंतु गाई आजारल्यामुळे त्यांच्या दुधांत रोगजंतूंना अनकूल स्थिती मिळते असे सांगण्यांत येते. संसर्ग घडलेले पाणी पिण्यानें हा रोग झाल्याचे सिद्ध झालें आहे. बॅसिलस डिप्थेरिआ कांहीं दिवस शुद्ध पाण्यांत ठेवल्यास त्यांचा नाश होतो. कारण तेथें त्यांना पुरेसें खाद्य मिळत नाही. घशांतील पापुद्रा गळून गेल्यावर त्याचे जंतू घशांत पुष्कळ काळ- पर्यंत टिकतात. पापुद्रा संबंध पडून गेल्यावर शेंकडा ६० लोकांत तीन दिवसांनी क्लैब्स टॉप्लर जंतू घशांतून सबंद नाहीसे होतात. शेंकडा पंचवीस लोकांत सात दिवसांनीं ते दिसले. शेकडा एक रोग्यांत हे तीन आठवडेपर्यंत राहतात. स्पर्शसंचारी जंतू असले तरी हे रोगी बाह्यतः