पान:आरोग्यशास्त्र.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १७१ निरोगी दिसतात. म्हणून पापुद्रा गळून पडल्यावर पुष्कळ महिने कृमिन पाण्याने गुळण्या घ्याव्या. नाकांतील खावांत हे जंतू असतात. म्हणून वरील पाण्यानें नासिका धुऊन स्वच्छ ठेवावी व ह्या रोगाच्या आरंभीं नाकांत स्राव ज्यास्त असल्यास धुण्याची पद्धत विशेषेकरून जानें ठेवावी. शरीराच्या बाहेर उजेड, वारा न लागेल अशा स्थानीं डिप्थेरिआच्या जंतूंचा जहरीपणा कित्येक महिने टिकतो. उजेड व हवा आणि आळी- पाळीची आर्द्रता व शुष्कता ह्यांच्या योगानें जंतू फार जल्दी नाश पाव- तात. ९८° सेंटिग्रेडचे शुष्क उष्णतेला हे जंतू जुमानीत नाहींत. परंतु ५८ डिग्रीचे आई उष्णतेनें हे दहा मिनिटांत मृत्यु पावतात. म्हणून आधणाच्या पाण्यानें किंवा वाफेचें पात्रांत हे मृत्यु पावतात. डिप्थेरिआ अधिक असणारे शहरांत शेंकडा ५ ते १० मुलांच्या घशांत हे जंतू असतात. रोगवाहक तपासून त्यांची नोंद करून ठेवावी व सांथ सुरू झाल्यावर ह्या वाहकांना पडसें आल्यास, ज्यांच्या स्रावांत हे जंतू सांपडतील त्यांना शाळेत येऊ न देतां पृथक् ठेवावें, म्हणजे साथ पसरत नाहीं. सांथ सुरू झाल्यावर संशय येईल अशा मुलांची बॅक्टेरिआ संबंधी तपासणी करावी. सांथ असल्यास स्यूडो डिप्थेरिआचे जंतू असलेले विद्यार्थी देखील शाळेतून बंद करावे. सांथ नसतांना त्यांच्यापासून सांथ उत्पन्न होत नाहीं. डिप्थेरिआ नासिकेंत असण्याचा संभव असल्यामुळे नासिकेची तपासणी करावी. बेरिंग, किटॅस्टो इ. चे शोधांवरून अॅटिटॉक्सिन सीरम प्रचारांत आलें आहे. त्यामुळे जनावरांना ह्या रोगापासून निर्भयता प्राप्त होते. व हा आजार होतांच त्यांच्या सीरमची पिचकारी दिल्याने रोगाची गति कुंठित होते. हें सीरम करण्याची रीतः - ३५° सें. उष्णतेच्या बाथमध्यें