पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आरोग्यशास्त्र जंतु असतात त्यांत रोगोत्पादक जंतूंचा नाश पुष्कळ शीघ्रतेने होतो. खोल अशा विहिरीचे पाणी कलुषित झाल्यामुळे टफाइड, सन्निपाताच्या सांथीचा प्रादुर्भाव किंवा आस्फोट कसा होतो हे वरील विवेचनावरून समजून येते. शुद्ध अशा खोल जलांत तुलनेने पाहतां कमी जंतु असतात म्हणून अशा पाण्यांत टैफाइड जंतूंचा प्रवेश झाल्यास त्यांची चेतना-शक्ति व विषार इतके दिवसपर्यंत टिकतात की, मोठा जलसमूह त्यामुळे स्पर्शसंचारी किंवा रोगसंचारी होतो. प्रकाशविरहित किंवा सर्य-किरण नसलेल्या खोल आंतीम जलांत टैफाइडच्या थोडयाशा जंतूंचा प्रवेश झाला तरी दोन तीन दिवसांत त्यांची वाढ वेगाने पुष्कळ होऊन सर्व जल दूषित होईल हे शक्य दिसते. नदीच्या खोल व कमी वेगवान प्रवाहाचे कक्षेत मलपातनाची sedimentation ) क्रिया चालू असल्यामुळे घन पदार्थ मध्ये अडकून त्याबरोबर तळी जातात. अशा रीतीने त्यांचे काही अंशी निराकरण (elimination) होते. नदीचे उदक जसेच्या तसे सांठवलेले अस- लेल्या एखाद्या मोठ्या जलाशयांत सुमारे चार आठवडेपर्यंत बॅक्टेरिआ राहिले तर त्यांपैकी शेकडा ९९ जंतु मरून जातील. एकादें संस्कार- विरहित नदीजल टैफाइड जंतूंनी मुद्दाम कलुषित केले तर त्या जंतूंचा ९ आठवडेपर्यंत देखील नाश होणार नाही. लंडन शहरांतील जलाशयांत पाणी साठविण्याची व शुद्ध कर- ण्याची खाली लिहिल्याप्रमाणे व्ववस्था असते. टेम्स नदीतून घेतलेलें पाणी एवढ्या अवाढव्य शहरास कित्येक दिवस पुरेल एवढ्या मोठ्या साठ्याचे जलाशयांत भरतात. कारण नदीला पूर आल्यामुळे गढूळ झालेले पाणी घेण्याची वेळ येऊ नये व पाण्यातील गाळ तळी बस- ण्यास अवकाश सांपडावा. जलाशयांतून ते निर्गलन-पात्राकडे जातें. तें शुद्ध होऊन आल्यावर योग्य उंचीवर केलेल्या व ज्याचेवर