पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ आरोग्यशास्त्र ७ ते १२ दिवस क्लेब्स लॉप्लर बॅसिलसूची वाढ करतात, म्हणजे परि- पूर्ण विष उत्पन्न होतें. नंतर हा द्रव पोर्सिलीन फिल्टरमधून गाळतात. म्हणजे जंतू निराळे वर राहतात. खाली उतरणारा निर्मल द्रव पिच - कारीनें घोड्यांमध्ये सोडतात. ह्या टॉक्सिनची २-३ महिनेपर्यंत वरचेवर पिचकारी दिल्याने घोड्याचे सीरममध्यें कर्बोलिक अॅसिड घालतात. नंतर तें गाळून त्याचें मापन करून वापरण्यासाठीं सांठवून ठेवतात. हा उपाय रोगोत्पत्ति होतांच करण्यांत यावा म्हणून स्थानिक सर- कार अँटिटॉक्सिन संग्रही ठेवतात व खाजगी डॉक्टरांना मूळच्या किंम- तीस विकतात व गरीब रोग्यांस मोफत देतात. ह्या दूरदर्शीपणाचा फार उपयोग होतो. कारण वेळीं ६ ते ८ हजार यूनिटचा डोज ऐन आरंभी पोंचण्यांत फार महत्त्व आहे. त्या सीरममध्ये रोगप्रतिबंधक गुणहि आहे. म्हणून रोग्याच्या घरांत अन्य निरोगी मुलांमध्यें त्या सीरमचे १००० -यूनिटचा उपयोग करावा. परंतु दुसरा डोस दिल्याने अॅनिफिलक्सिसच्या भावना होण्याचा संभव असतो हें ध्यानांत ठेवावें. अतिसार ( डाएरिआ ) अतिसार हैं अनेक व्याधींत होणारे एक चिन्ह आहे. परंतु तान्ह्या मुलांत व बालकांत उन्हाळ्याच्या मध्यभागी किंवा शेवटीं होणारा व ज्यांत रेच हीच प्रधान भावना आहे असा एक आजार हा येथें अर्थ धरला आहे. हा आजार बाल व वृद्ध लोकांत व क्षीण प्रकृतींत विशेषतः होतो. अतिसाराच्या सांथीची चिन्हें विषूचिकेच्या चिन्हांसारखीं असतात. पेटके, शक्तिपात, गार घाम, हातपाय गार पडणें इ० भावना होतात. दूषित अन्न व अस्वच्छ पाणी यांच्या सेवनानें, त्रिघडलेली हवा हंगल्यानें हा अतिसार उद्भवतो. अन्न, पाणी व जमीन यांत कुजण्याच्या क्रिया उन्हाळ्याच्या दिवसांत जलदी होतात. व जोराच्या असतांना व