पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १७३. अतिसार झालेल्यांपैकी पुष्कळ रोग्यांस कोथकारी जंतू किंवा त्यांच्या- पासून उप्तन्न झालेलें विष हें कारण असतें. ह्या अतिसाराला ( डाएरिआ ) अनेक नांवें आहेत. त्यांपैकीं एपिडेमिक डाएरिआ किंवा एपिडेमिक एंटेरेटिस किंवा जायमाटिक एंटेरेटिस ह्यांपैकी एखादें नांव वापरणें अधिक बरोबर व सोईचें होईल. ज्या कारणांनी डाएरिया होतो त्याच कारणांनी उन्हाळ्यांत संग्रहणी म्हणजे डिसेंटरी होते. थंडी व गारठा लागणें हें संग्रहणीचें प्रधान कारण मानण्यांत येतें. परंतु गारठ्यानें आंतड्यांत थोडा दाह होतो. व ह्या अवस्थेत नेहमीं प्रतिरोधक शक्ति कमी झाल्यानें त्या जागेंतील नेह- मीच्या जंतूंना वाढ होण्यास स्थल मिळून त्यांची संख्या वाढते, व संग्र- हणीला सुरुवात होते. इंग्लंडांत अतिसाराच्या सांथीबरोबर संग्रहणीचा आजार उत्पन्न होतो. ह्या आजारांत गुदावाटे रक्त व आंव जाते. वेड्यांचे आतुरालयांत हे आजार होतात. ह्या आजारास कोलैटिस म्हणतात हा रोग्यापासून निरोग्यांमध्यें बहुधा पसरतो. संग्रहणी व अतिसार आपोआप व पूर्वीच्या दुसऱ्या रोग्यांशी संबंध नसतांना बहुतेक वेळा उप्तन्न होतात. तरी अतिसाराच्या मळापासून हा रोग कित्येक वेळां अधिक फैलावतो. रोगाचा संसर्ग पाण्याच्या द्वारा होतो, व उकळलेले पाणी प्याल्याने रोगाची सांथ थांबते. अंगावर पिणाऱ्या मुलांपेक्षां थोडेंसें अन्न खाऊं लागलेल्या मुलांत हा आजार अनेक पटीने ज्यास्त होतो. व ह्या दोन कारणांनी उद्भवलेल्या रोगांच्यापेक्षां अनेक पटीनें निवळ कृत्रिम अन्नावर राहणाऱ्या मुलांत एपिडेमिक एंटेरेटिस होतो. अतिसाराच्या मृत्युसंख्येचें प्रमाण मे पासून वाढू लागून जुलईच्या अखेरीस व ऑगस्टच्या आरंभी जल्दी ज्यास्त होत जातें.