पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ आरोग्यशास्त्र वाळू व कंकराचा प्रदेश अतिसाराच्या मृत्युसंख्येच्या जास्त प्रमा- णांत अनुकूल असतो. जमिनींत सेंद्रिय द्रव्यांचा व मलमूत्रादि उत्स- र्जित द्रव्यांचा प्रवेश होणें यानें मृत्युसंख्येचें प्रमाण वाढतें. जमीन आई असावी, परंतु तिच्या गर्भात हवेचा प्रवेश न होण्याइतकी भिजट नसावी. वरून पाझरलेल्या पाण्यानें किंवा खालील जलकेशाकार शक्तीनें वर ओढल्यानें ती ओली झालेली असते. अंधार, केर, माणसांची गर्दी, अस्वच्छता हीं घरांत असल्यानें अतिसारांतील मृत्युसंख्या वाढते. दूध व दुसरें अन्न उघडें ठेवल्यास माशांमुळे व रस्त्यांतील लिंदीचे कण धुरळ्याबरोबर उडून त्यांचा प्रवेश त्यांत झाल्याने ह्यांत जंतूंचा संचार होतो. म्हणून प्रतिबंधक उपायांत गृहांतील स्वच्छता, सेंद्रिय, प्राणिज व उद्भिज केरकचरा विलंब न करतां फेंकून देणें, अन्नावर व दुधावर माशी न बसूं देणें व धूळ कमी करण्यासाठीं सुक्या हवेंत रस्ते व आंगण वरचेवर झाडणें व त्यावर पाणी शिंपडणें हे सर्वांत महत्त्वाचे प्रतिबंधक उपाय आहेत. अतिसार हा आजार बालपणाच्या प्रथमभागी होणारा आहे. मृत्यूंपैकी शेंकडा ८० दोन वर्षांचे आंतील मुलांमध्ये होतो. परंतु ह्यांपैकी बरीच संख्या हातावर वाढविलेल्या मुलांमध्ये असते. म्हणून मोठ्या शहरांत, कारखान्यांत आयांनीं कामावर जाणें हें एक ध्यानांत ठेवण्यासारखें कारण आहे. हा आजार एकाएकीं उद्भवतो. परंतु रेच हें एक बाह्य चिन्ह आहे. कारण मरणोत्तर परीक्षेत मूत्रपिंड, यकृत ( वसामय निकृष्टभवन ) व पांथरी ह्यांचें निकृष्टभवन झालेलें दिसतें. फुप्फुसांत न्युमोनियाजन्य दाह आढळतो. न्यूज होमच्या शोधावरून एपिडेमिक डायरिया होण्याची कारणें खाली दिल्याप्रमाणे आहेत. (१) नळांतून मैला वाहून नेण्याची पद्धत ठेव- णाऱ्या शहरांत अतिसार कमी होतो. अन्य मार्गांनीं तो काढून टाकण्याची