पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ आरोग्यशास्त्र मस्का आपलीं अंडीं विशेषतः लिदींत घालते. परंतु शेण, मळ व दुसऱ्या उत्सर्जित द्रव्यांत व केरांतहि घालते. अंडी घातल्यापासून माशी तयार होण्यास बहुधा ८ पासून २० दिवस लागतात. अंड्यांचे वाढीला आर्द्रता, उष्णता व अन्न ह्यांची आवश्यकता असते. ही कमी असल्यास वाढीस अधिक वेळ लागतो किंवा खुरट्या माशा निपजतात. अंड्यां- तून बाहेर पडल्यापासून दोन तीन आठवड्यांत त्या प्रौढावस्थेस पाव- तात. मादी चार ते सहा पाळ्या अंडी घालते. दर पाळीस १२० ते १५० अंडी ठेवते. खत इत्यादींच्या पोकळ्यांत अंडी ठेवण्यांत येतात. जरुरी पडल्यास अंडी ठेवल्यापासून तीन दिवसांनीं उत्सर्जित पदा- थांतील खाद्य सोडून लार्वी जमिनीच्या भेगांत जाऊन वाढीस लागतात. सुमारें चौदा दिवसांत लार्वीच्या तीन अवस्था होतात. इमाँगो बनण्याला आणखी ४/५ दिवस लागतात. लावला उष्णता व आर्द्रता लागते. परंतु युपीला उष्णता व कोरडेपणा लागतो. ही स्थिती लिदीमध्ये चांगली असते. जरी गृहांतील सर्व जातींच्या माशांची वाढ पुष्कळ असते तरी गारठा, पावसाची झड व घाणीचा अभाव ह्यांनी ही संख्या फार कमी होते. माशीचें सहा आठवडे आयुष्य असतें व अनुकूल ऋतूंत जास्त असतें. माशा उन्हाळ्यांत वाढतात व हिंवाळ्यांत कमी होतात. टैफॉईड ऊर्फ एंटेरिक फीवर बॉसलस टैफोसस (Bacillus Typhosus) मुळे उत्पन्न होणारा टैफॉइड ज्वर हा विशिष्ट प्रकारचा रोग आहे. मागल्या रोग्यापासून ह्याची सांथ उद्भवल्याचा धागा' दर वेळी लावतां येत नाही. कारण दूषित स्थळीं हे जंतू कांहीं काळपर्यंत जिवंत राहतात व हा रोग सौम्य अस- ल्यास ह्याची परीक्षा न झाल्याने जपणुकीच्या अभावीं अन्य मनुष्यांत ह्याचा फैलाव मात्र होतो. शिवाय टैफॉइडच रोगी बरे झाल्यावर पुढे