पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १७७ कित्येक महिने किंवा वर्षे त्यांच्या विष्ठेत ह्या रोगाचे जंतू बाहेर पडत असतात. अशा लोकांना " टैफॉइडकॅरिअर्स " ह्मणजे “ टैफॉइड- वाहक म्हणतात. ह्यांच्या मळाचे संपर्कानें हा रोग उत्पन्न होतो व फैलावतो. 39 ह्या रोगाची मुग्धावस्था १० ते १४ दिवस असते; व कधीं कधीं २१ ते २३ दिवसांपर्यंत देखील असते. प्रेतछेदनानंतर हे जंतू पित्ताशयाच्या भिंतींत किंवा त्यांतील पित्तांत सांपडतात. टैफॉइड झाल्यापासून दहा दिवसांच्या आंत हे जंतू रक्ता- पासून विभक्त करतां येतात. रक्तांतून नाहींसे झाल्यावर हे जंतू प्लीहा, पेयरचे ग्लँड व मेसेंटरीमधील पिंड ह्यांत सांपडतात. रोगाच्या प्रारंभी व रोगोत्तर क्षीणतेंत हे मलांत सांपडतात. दुसऱ्या आठवड्यांत हे सूत्रांत सांपडतात. रोगाचा संचार होण्याची कारणे: - (१) टैफॉईड झालेल्या रोग्यांचा संसर्ग तिसऱ्या व चौथ्या आठवड्यांत टैफॉइड बॅसिलस मलांत विपुल असतात, (२) सौम्य व हिंडत्या फिरत्या रोग्यांचा संपर्क, (३) बॅसिलस टैफॉइडचा संपर्क झालेले परंतु ज्यांत तो रोग अजूनहि उमटला नाहीं असे लोक, ( ४ ) रोगमुक्त परंतु ज्यांचे मूत्रांतून बॅसिलस जातात असे लोक, (५) टैफॉइडवाइक लोक. टैफॉइडवाहकांचे एक नमुनेदार उदाहरण येथे दिलें आहे. खाणा- वळीण बाईच्या घरीं प्रत्येक नव्या नोकरास आंत्रविषयक भावना होऊन हा आजार होई. त्या बाईला पूर्वी टैफॉइड झालेला होता. शेवटीं तिचा मल तपासतां त्यांत टैफॉइडचे जंतू सांपडले. टैफॉइडच्या शेवटल्या अवस्थेत व रोगोत्तर क्षीणावस्थेत शेकडा २० ते ३० मनुष्यांच्या मूत्रांत टैफॉइड बॅसिली सांपडतात, हें ध्यानांत ठेवणें अगत्याचें आहे. मूत्रानें अंगावरील व बिछान्यावरील कपडे, पायखान्याचे १२