पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १७९ लोकांचे अंगीं प्रतिरोध करण्याची शक्ति फार कमी असते. टैफॉइड एकदां झाल्यानें आयुष्यभर त्याचेपासून बहुधा निर्भयता असते. व हा रोग सर्व वयांत व स्त्रीपुरुषांस होतो. परंतु १५ ते २५ वयापर्यंत होण्याचें प्रमाण ज्यास्त असतें. स्त्रियांत ३ ते २० वयापर्यंत होणाऱ्या रोग्यांत मृत्यूचे प्रमाण ज्यास्त असतें. टैफॉइडपासून मृत्यूचें प्रमाण शेंकडा १५ ते २० असतें. बाल्या- वस्थेत झाल्यास त्याचें स्वरूप सौम्य असतें. हिंवाळ्यांत ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत हा आजार फार वाढतो व तीव्र प्रकारचा असतो. भरतीच्या पाण्यामधील शिंपल्यांतील मासे व ऑइस्टर इत्यादींचे शिंपल्यांत दूषित पदार्थांचे पाण्याचे संपर्कानें टैफॉइडचे जंतू सांपडतात. टैफॉइडचे जंतू ऑइस्टरमध्ये कित्येक दिवस जिवंत राहतात व समुद्रजलांत पुष्कळ दिवस जगतात. म्हणून ऑइस्टर स्वच्छ डबक्यांत सांठविण्या- साठी सक्ती केली पाहिजे. व दूर देशच्या जागेचे ऑइस्टर तपासल्या- शिवाय वापरू नयेत. टैफॉइड व कॉलऱ्याचे साथीचे अतिसार होत असतो. कदाचित् हे त्या त्या रोगाचे फिरते रोगी असतील. ज्या ठिकाणी माशा असतात, त्या ठिकाणी रोगाचा फैलाव त्यांचेपासून विशेषकरून होतो. कारण त्याच्या मळावर त्या बसतात, व पुन्हा उडून अन्नावरहि बसतात. दूषित धुराळ्या- पासूनहि हा रोग पसरतो. टैफॉइड ज्वराच्या विष्ठेत उत्पन्न झालेल्या माशांच्या अंड्यांत टैफॉइड जंतू नसतात. शुद्ध पाण्याचा पुरवठा असून देखील कित्येक जागीं टैफॉइड काय. मचा असतो. अशी जागा व जमीन अस्वच्छ, ओलसर व आरोग्याचे नियमानुसार साफ ठेवलेली नसते. गटारें, पायखाने नीट व स्वच्छ नसून त्यांतून पाणी जमिनीत झिरपतें.