पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० आरोग्यशास्त्र टैफॉइडच्या सांथी बिवडलेल्या पाण्यापासून वरचेवर उद्भवतात, हें आढळून आलें आहे. म्हणून पिण्याचे पाण्यावर मूळ ठिकाणापासून नळापर्यंत सर्व ठिकाणांवर चांगली देखरेख ठेवली पाहिजे. व पाण्याची रसायनरीत्या व जंतूंचे दृष्टीनें वरचेवर तपासणी केली पाहिजे. सीरमच्या परीक्षेनें एहवीं केलेल्या टैफॉइडच्या परीक्षेस मदत होते. रोग्याचें रक्त कॅॉपिलरी ट्यूबमध्यें ठेवून मोहोरबंद करून तपासण्यास धाडावें. त्यांत डिप्थेरिआचा संशय आल्यास जंतुविरहित कापसाचे बोळ्याने घसा पुसून तो तपासण्यास धाडावा. क्षयाचा संशय आल्यास बेका धरून तपासविण्याची व्यवस्था करावी. निश्चयाची होते. व अंमलबजावणीस मदत होते. रोग्यास दूर (पृथक् ) ठेवणें, कपडे इत्यादि जंतुविरहित करणें, किंवा सॅनिटोरियममध्ये रोगी धाडणें ह्या व्यवस्था अमलांत आणण्यास ठीक पड़तें. अशा शोधानें परीक्षा टैफॉइडप्रतिबंधक इनॉक्युलेशनचा उपयोग आतां मान्य होऊं लागला आहे. टैफॉइड बॅॉसेलीची लागवड करून उत्पन्न झालेल्या जंतूंचा उष्णतेनें संहार करून मृत जंतू असलेलें द्रावण प्रतिबंधकार्यार्थ रक्तांत सोडतात. ह्या उपायाचा परिणाम ब्रिटिश लष्करांत चांगला दृष्टीस पडला. न टोचलेल्या लोकांत हा आजार पांचपट झाला. टोचलेल्यांत आजार झाल्यास सौम्य प्रकार असतो. रोगसंकर कमी होतात व दुबार उलटत नाहीं. ह्या प्रतिबंधक इनॉक्युलेशन चा परिणाम दोन वर्षांपेक्षां कमी टिकतो. क्षयग्रंथी विकार ( टयुबर्क्युलोसिस ) सर्व उष्णरक्त प्राणी ग्रंथीविकाराला पात्र आहेत. मानव जातीच्या भिन्न वंशांत व त्याच वंशांपैकीं सर्व लोकांत ही पात्रता एकसारखी नसते. क्षयी दंपत्यापासून झालेल्या संततीच्या शरिराची रचना ग्रंथीच्या आक्रमणास अनुकूल असते. म्हणून हा आजार अनुवांशिक असें