पान:आरोग्यशास्त्र.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १८१ मानीत असत. हा आजार सजन्म असल्यास अत्यंत अल्प प्रमाणांत असेल. क्षयी वासरें आईचे अंगावरून तोडून आरोग्याचे नियमांप्रमाणें पाळल्यास तीं धष्टपुष्ट व निरोगी वासरांसारखी होतात असे बँगनें सिद्ध केलें आहे. जन्मकाळीं ग्रंथींसंबंधी इजा फार विरळा असते व जेव्हां असते तेव्हां प्लॅसेंटामधील रुधिराभिसरामुळे होते. डेलेफिक, बोल्टस् इत्यादि शोधकांना प्राण्याचे जन्मापासून पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या आठवडयांत ट्यूबर्क्युलोसिसचा गंध दिसून आला नाहीं. क्षयी डुक- रांची संतती निराळ्या जागी ठेवल्यास अरोग राहते, असें कॉचला आढळून आलें. चाळीस वर्षांच्या वरील मनुष्याचे मरणोत्तर परीक्षेत बहुतेकांच्या फुप्फुसांत क्षयग्रंथीचा भाव ( स्कार्स) दिसत असल्याने जंतुसंचार अखंडित व सर्वत्र होण्याचा संभव व त्यांचा प्रतिकार करण्याची मानवी शक्ति ह्यांचे अस्तित्वाचें ज्ञान होतें. अशा मनुष्यांमध्यें जिवंतपणीं क्षयाची बाह्य चिन्हें मुळींच नजरेस आली नव्हती. मेक्निकॉफ (Metchnikoff) च्या मतें अर्वाचीन कालांतील सुधारलेल्या वस्तींत बाल्यावस्थेत पुष्कळ मुलांत क्षयग्रंथींचा अल्प प्रमाणांत अथवा क्षीण अथवा मंद अवस्थेत संचार होतों म्हणून मागाहून जहरी स्वरू- पांत व मोठ्या प्रमाणांत शिरलेल्या जंतूंविषयीं निर्भयता उप्तन्न झालेली असते. बेहरिंगच्या मतें मानवी क्षयग्रंथी विकार बाल्यावस्थेत जडतो. लिंफॅटिक वगैरे पिंडांत तो मुग्धावस्थेत राहतो व त्याचे वाढीला अनु- कूल अशी शरिराची स्थिती झाल्यावर तो वृद्धि पावतो. फुप्फुसांतील व्यापी ट्युबर्क्युलोसिस क्षय ( Phthisis), टेबीज मेसेंटि- रिका (Tabes Mesenterica), ट्युबर्क्युलर मिनिजैटिस, ट्युबर्कल आजाराचे अन्य प्रकार व (Scrofula) गंडमाळा ह्या रोगांना " ट्युब -