पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणी V आच्छादन आहे अशांत ते शोधित-जल सांठवितात. निर्गलन-पात्रांत ( filter ) पृष्ठभागी सरासरी वाळू २ फूट उंचीची असते. तिचे खाली लहान दगडी कंकराचा थर व याहि थराचे खाली मोठ्या कंकराचा थर असतो. कंकराचे थराची सरासरी उंची ३ ते ८ फूट असते. निर्गलन- पात्रांत भरलेल्या पाण्याची उंची एका फुटाहून अधिक नसते. एका तासांत एक स्क्वेअर फूट जागेतून सुमारे ७॥ शेर पाण्याचे निर्गलन होते. पात्रांतील बारीक वाळूपैकी वरील थर काढून खळखळून धुऊन पुन्हां पसरतात. कारण तींत गाळ सांठतो. ताज्या निरोगी मानवी मलांत बॅसिलिस कोलै कम्युनिप्त ह्या जातीचे जंतु असतात. त्यांपैकी शेकडा ८५ नमुनेदार असतात. मैलापाणी व त्यांतून निघणाऱ्या वाफांमध्ये नमुनेदार जंतूंचे प्रमाण कमी असतें व मैलापाणी बंद झाल्याने अर्थात् याहिपेक्षा कमी होते. संस्कार- विरहित नदीचे पाण्यापैकी शेकडा ९८ जंतु जल सांठवून ठेवण्याने व जलशोधकानें-(filter ) निर्मल केल्याने नाहीसे होतात. ह्यांपैकी शेकडा ३८ भाग नमुनेदार बॅसिलीकोले असतात. ह्यांतून जलशोध- काचा व जलनिधींत उदक सांठवून ठेवण्याचा किती मोठा उपयोग आहे हे ध्यानात येईल. अशा रीतीने शुद्ध केलेले पाणी पिण्याचे कामी बिनधोक वापरता येईल. परंतु फिल्टरची क्रिया व्यवस्थेने चालली आहे किंवा नाही हे पाहण्याची व एकदां शुद्ध केलेले पाणी पुन्हां दूषित न होऊ देण्याची खबरदारी घेतली पाहिजे व निर्गलन-क्रिया मंदतेने झाली पाहिजे. जलशोधकाचा वरील थर मलिन झाल्यास पाल- टला पाहिजे. वाळूची स्थूल क्रिया घडल्याने जलाची मुख्यतः शुद्धि होते. शिवाय वाळूचे बाह्य थरांत असलेला प्राणवायूहि जल शुद्ध करतो. जलशोधकामधील वाळूचे वर एक चिकट थर उत्पन्न होतो त्याचे फटीं- तून खाली जातांना जंतु नाश पावतात. फिल्टरचे उपयोगाचे महत्त्व . . .