पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ लोसिस " घालतात. आरोग्यशास्त्र ह्या सदरांत (Registrar General ) रजिस्ट्रार जनरल पांच वर्षांच्या खालील मुलांत क्षयग्रंथीपासून होणाऱ्या मृत्युसंख्येचें प्रमाण ज्यास्त असतें. दूषित दूध हें याचें कारण असावें. कारण : -- प्रावण्य व प्रत्यक्ष अशीं दोन प्रकारची कारणें आहेत. प्रावण्य कारणें : - अशुद्ध हवा; धुरळ्यांत काम करणें; जमिनीचा व घराचा दमटपणा; अस्वच्छ व अंधाराचे घर; दारिद्र्य व त्यामुळे वाट्यास येणारे अपुरे अन्न, वारा, ऊन, पाऊस व गारठा लागणें; मद्यपान, जखमा व छातीची विरूपता हीं कमी महत्त्वाचीं प्रावण्यकारणें आहेत. घरांतील गर्दी व अस्वच्छता ह्यांचा इतका वाईट परिणाम असतो कीं ज्या पेठेत सर्व घरांच्या मागल्या बाजू एकाला एक चिकटून असतात तेथें १००० लोकसंख्येत क्षयसंबंधानें ५.२ मृत्युसंख्या असते. जेथें शेंकडा ५६ घरें अशीं असतात तेथें ३.६ होती व जेथें शैकडा २३ असतात ते ३.३; व जेथें सर्व घरांच्या पुढील व मागील बाजू खुल्या असून हवा पुरती खेळते तेथें हें प्रमाण २.८ असतें. दमट जागा इरिगेशनसारख्या उपायांनीं शुष्क कोरड्या केल्यास तेथें क्षयापासून होणाऱ्या मृत्यूचें प्रमाण े ते रे कमी होतें. ट्युचर्कलचे जंतू क्षयांतील कफांत असतात. कफ वाळल्यानंतर त्याचे कण घरांतून व रस्त्यांतून उडतात व ते ढुंगण्यांत आल्यानें जंतूंचा संचार होतो. एका कचेरींत एका क्षयी मनुष्यामुळे बारा वर्षांत तेर्वास कारकुनांपैकी अकरा असामींना क्षय झाला. त्या कचेरींतील जमीन सच्छिद्र होती. तेथें पिकण्या नव्हत्या. कारकून कामावर येण्याचे अगोदर कचेरी झाडण्यांत येण्यानें तेथील हवेंत धुराळा असे. पुढे तेथील जमीन सपाट करून डांबर व सिमेंटानें तुळतुळीत केली. पिकदाण्या पुरवून