पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १८३ त्यांच्याबाहेर थुंकण्याची मनाई करण्यांत आली व रात्रीं ओल्या फडक्यांनीं झाडण्याची व्यवस्था ठेवण्यांत आल्यावर नवीन रोगी होण्याचें बंद पडलें. अन्नद्वारां क्षयग्रंथींचा संचार शरिरांत होतो. दुभती गाय क्षयाला विशेष पात्र असते. क्षयी जनावरांच्या दुधापासून व गाईच्या जातीच्या प्राण्यांचें अर्धकच्चें मांस खाण्यानें ह्या रोगाचे जंतू मनुष्याच्या पोटांत शिरतात. क्षयाचे प्रतिबंधक उपायांचे संक्षिप्त वर्णन (१) (अ) प्रत्येक क्षयी रोग्याबद्दल नोटीस, खाजगी व सरकारी डॉक्टरांनी योग्य अधिकाऱ्याकडे दिली पाहिजे. (आ) नोटीस पोहोंचल्यावर आरो- ग्याच्या अधिकाऱ्यानें त्यांच्या घरी जाऊन घरच्या स्थितीचें टिपण करावें. (इ) थुंकी पृथक् भांड्यांत टाकण्याला व तिची वाट लावण्याला रोग्याला शिकवावें. (ई) दिवसा व रात्रीं त्यानें खोलीच्या खिडक्या मोकळ्या टाकाव्या. रात्रीं खोलींत एकटें निजावें; निदान आपला बिछाना तरी निराळा ठेवावा. (उ) जेवण, वस्त्रप्रावरण व गारठ्याचा बंदोबस्त इत्यादि गोष्टींविषयीं त्याला सल्ला द्यावा. (ऊ) आरोग्यालयांत ( सॅनिटोरियममध्ये) राहण्याचा त्याला बोध करावा. ( २ ) ज्या धंद्यापासून किंवा गृहकामामुळे क्षय वाढतो ते बंद करावें. ( ३ ) क्षयाची माहिती, त्याच्या उत्पत्तीची कारणें व त्याचा फैलाव न होऊ देण्यासाठी करावयाचे उपाय ह्यांची माहिती व्याख्यानद्वारां, हस्तपत्रकांनी व मॅजिक लॅटर्नच्या सहाय्यानें लोकांना द्यावी. ( ४ ) संशयित कफ, दूध, मांस इत्यादींची परीक्षा आरोग्याच्या इन्स्पे- क्टरने मोफत करावी. (५) स्थानिक सरकारनें क्षयी रोग्यांनी वापरलेल्या खोल्यांचें निर्जंतुकरण मोफत करणे.