पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ आरोग्यशास्त्र ( ६ ) क्षयाकरितां आरोग्यालयें (सॅनिटोरियम्) स्थापन करावीं. न्यूज होम म्हण ज्या देशांत क्षयी लोकांना सॅनिटेरियम्मध्ये ठेवावयाची पद्धत आहे तेथें क्षयापासून होणाऱ्या मृत्युसंख्येचें प्रमाण कमी झालें आहे.” ( ७ ) भाडयाच्या व सार्वजनिक गाड्यांमध्यें व सार्वजनिक जाग्यां- मध्ये थुंकण्याची कायद्यानें बंदी करावी. (८) दुभत्या गुरांची कुरणें, गवळ्यांचीं घरें, दुधाचीं दुकाने ह्यांच्यावर सक्त देखरेख ठेवावी. गुरांची परीक्षा त्यांचे डॉक्टरांकडून करावी व ट्युबर्क्युलिननें दुभत्या गाई तपासाव्या. क्षयी गाईंचें दूध विकण्याला प्रतिबंध करावा. ( ९ ) सार्वजनिक खाटीक बाजारांतील मांसाचें परीक्षण करावें व परठिकाणचे व परदेशाचे मांसावर व दुधावर ताबा ठेवावा. आरोग्यालय ( सॅनिटोरियम् ) ह्यांत ताप नसलेले व प्रथमावस्थेतील रोगी निवडून घ्यावे. काळजीनें तपासून घेतलेला जुनाट रोगीहि घ्यावा. कधीं कधीं नव्यापेक्षां त्याला अधिक उपयोग होतो. ह्या आल्यांत निदान सहा महिने राहिल्या- शिवाय उपयोग होणार नाहीं. आरोग्यालय सोडून गेल्यावर पूर्वीच्या घरांत व धंद्यांत तो न राहिला तर बरें. बाहेर पडणाऱ्या इसमावर कांहीं काळ देखरेख ठेवणारें स्वतंत्र मंडळ असावें. त्याने त्याला योग्य सल्ला द्यावा व खुल्या जागेंत करण्यासारखा उद्योगधंदा पाहून द्यावा. आरोग्यालयांतील चिकित्सेचें सामान्य स्वरूप खालीं दिलें आहे : (१) रोग्याचा जितका काळ मोकळ्या जागेंत अधिक घालवणें शक्य असेल तितका घालविणे. (२) रोगाच्या कांही अवस्थेत पूर्ण विसावा लागतो व कोहीत शक्त्यनुसार व्यायाम करावा लागतो. (३) शिक्षण व शिस्तीचे परि-