पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १८५ णाम रोग्यावर कायमचे होण्यासाठीं व्यवस्था ठेवावी. (४) रोग्यावर बहुतेक दिवस डॉक्टरची देखरेख पाहिजे. (५) रोग्यांचें वर्गीकरण करावें. (६) दिवसांतून तीन वेळां त्यांची तपासणी करावी. त्यांचा ताप पहावा व त्यांच्या प्रकृतीच्या स्थितिप्रमाणें अन्न, व्यायाम इत्यादिविषयीं सूचना द्याव्या म्हणून एका डॉक्टरच्या नजरेखालीं अठ्ठेचाळिसांपेक्षां जास्त रोगी नसावे. (७) आरोग्यालयांतील रहिवाशांना कांहीं काम देण्याची सोय ह्या ठिकाणी असावी. आरोग्यालय गरीब स्थितींतलें असल्यास ही व्यवस्था अवश्य पाहिजे. (८) ताकदीप्रमाणें थोडें बागाईत काम, कोंबडी, बदकें, इत्यादि पाळणे, मधमाशा पाळणें, असले हलके धंदे सांगितल्यानें ते आळशी होत नाहींत, इतकेंच नव्हे तर, त्यांना खुल्या जागेतील धंद्यांचें शिक्षण मिळतें व आरोग्यालय सोडल्यावर एखादे वेळी ह्या शिक्षणाचा उपयोग होतो. (९) कांहीं आरोग्यालयांत क्रमाक्रमानें वाढत्या कष्टाचीं कामे देतात. त्यामुळे रोगाचे चिकित्सेला मदत होते. आणि रोग्याचें बळ व रोगप्रतिबंधक शक्ति वाढते. सॅनिटोरियमूची जागा ही महत्त्वाची पहिली बाब आहे. टेकडीच्या दक्षिण बाजूच्या उताराची जागा सर्वोत्कृष्ट असते. उत्तर व दक्षिणे- कडील वाऱ्याचा बचाव उंचवट्याच्या जमिनीनें किंवा झाडांनीं व्हावा. झाडी फार असल्यास दक्षिण बाजू साफ मोकळी करावी. त्या जागीं शुद्ध हवा, पुष्कळ उजेड, स्वच्छ व कोरडी जमीन, बेताचें व सारखें टिकणारें उष्णमान व वाऱ्यापासून बचाव इतक्या गोष्टी असाव्या. ही जागा सुगम, आगगाडीपासून थोड्या अंतरावर व मोठ्या रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर असावी. म्हणजे धुरळा उडाल्या- पासून त्रास पोहोंचणार नाहीं. शंभर खाटांची सोय असलेल्या संस्थेची १०० एकर जमीन असावी. म्हणजे फिरण्याचे रस्ते निवाऱ्याचे करतां येतात. गाई पाळणे, भाजीपाला लावणें व रोगमुक्त लोकांना