पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ आरोग्यशास्त्र कामकाज देणें ह्या तजविजी करण्यास जागा मिळते. एका सोप्यांत साहापेक्षां ज्यास्त खाटा नसाव्यात. विपुल खर्चानें चालविलेल्या आरो - ग्यालयांत रोग्यागणिक स्वतंत्र खोली असते. ह्या खोल्या देखरेख ठेवण्याचे कचेरीच्या भोंवती अंतरा अंतरावर असतात. प्रत्येक खोली जमिनी- पासून उंच बांधलेली असते. तिचे चारी बाजूंला खिडक्या असतात. पुढें एक पडवी असते. ह्या खोल्यांत दोन तृतियांश व्यवस्था असते. निजण्याची व्यवस्था एका मोठ्या इमारतीत असते. मुख्य इमारतीला चारी बाजूंस पडव्या असतात. माडीच्या बाहेर खुले सज्जे असतात. तेथें चाकेँ लावलेले पलंग नेतां यावे अशी त्यांची ठेवण असते. निजण्याची खोली निदान १५०० क्यूबिक फूट आकाराची असावी. तिची जमीन कांक्रीटवर ओकसारख्या मजबूत जातींच्या लांकडाच्या फळ्या घालून केलेली असते. भिंती धुऊन काढण्याजोग्या डिस्टेंपरच्या असाव्यात. सॅनिटोरियमूच्या जमिनी अभेद्य, अछिद्र व तुळतुळीत असाव्या. भिंती धुतां येतील अशा असाव्या. इमारतीवर नळ्यांचा पत्रा असावा. आरोग्यालयांत निर्जंतुकरणाची सोय, औषधालय, सल्लागृह, रोग- शोधकगृह ( Pathological laboratory ), प्रेतगृह, प्रेतछेदनगृह, धोत्रीगृह, वाळवण्याच्या खोल्या, स्नानगृहें, शस्त्रक्रियागृह, पुस्तकालय सभागृह, करमणुकीचे दिवाणखाने, खाजगी दुभत्याची जागा, आक- स्मिक आघात व प्रसंगासाठी सोय, विद्युदुत्पादकगृह इतकी पाहिजेत. ह्यावरून दिसून येईल की, आरोग्यालय हें खर्चाचे काम आहे. प्रत्येक खाटेमागे १०० ते २०० पौंड खर्च केल्यास चिकित्सेची समाधानकारक व्यवस्था होते. ह्यापेक्षां फार अधिक खर्च करतात. परंतु तो निष्कारण होय. क्षयाचा दवाखाना ( ऍटिटघुर्क्युलस डिस्पेन्सरी ) क्षयाचे निर्मूल-