पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १८७ नाच्या काम ही एक महत्त्वाची बाब आहे. ह्या दवाखान्यांत रोग्यांच्या घरांतील संपूर्ण माहिती पाहिजे व आरोग्याचे अधिकारी, आरोग्या लय, ढकललेल्या रोग्यांसाठीं अतुरालय, रोगमुक्तांवर देखरेख ठेवणारें मंडळ ह्या सर्वांशीं दवाखान्याचा संबंध पाहिजे. त्याचे जवळ रोग्यांची व वरील संस्थांची पूर्ण माहिती पाहिजे. रोग्यांचीं घरें तपासण्यास, तेथील रहिवाशांना शिक्षण देण्यास व कफादिकांची परीक्षा करण्यास नळ्या, कांचा वगैरे पुरवण्यास दाया व आरोग्य-नोकर पाहिजेत. दवाखान्यांतून औषधे दिली पाहिजेत व गरिबी असल्यास अन्न व वस्त्र पुरवली पाहिजे.. म्हणून स्थानिक परोपकारी संस्थांची सहानुभूती त्यांनी मिळविली पाहिजे. सांथीचा इन्फ्ल्यूएन्झा सांथीच्या स्वरूपांत इन्फ्ल्यूएंझा स्पर्शसंचारी विकार आहे व विशिष्ट प्रकारचा ज्वरांत त्याचें वर्गीकरण केलें पाहिजे. ह्या रोगाचें कारण निश्चयेंकरून समजलें नाहीं. ऋतु, देश, हवामान, विशेष प्रकारची जागा ह्यांचा निर्बंध ह्या रोगाला नाहीं. आरोग्यघातक स्थितीशी ह्याचा फारसा संबंध नाहीं. गरिबांवर ह्याचा हल्ला कमी होतो. हा रोग स्पर्शसंचारी आहे. हा मनुष्यांच्या दळणवळणानें पसरतो व वाऱ्याने पसरत नाहीं, हें खालील माहितीवरून ध्यानांत येईल. एका घरांत एका मागून एक असे आजारी पडतात. पहिला रोगी मागील अमुक संसर्गामुळे झाला असें दाखवितां येतें. रोग्याशीं संबंध जास्त येणारे डॉक्टर व दाया यांच्यामध्ये हा विशेषेकरून होतो. जनतेशी संबंध न येणारे असे कैदी, समुद्रांतील दीपगृहांतील इसम, जहाजांवरील खलाशी ह्यांमध्ये हा रोग पसरत नाहीं. हा रोग प्रथम शहरांत होतो. नंतर खेड्यापाड्यांत शिरतो. ह्या आजाराने एकदम पुष्कळ लोक पडण्याचें कारण, ह्या रोगाच पात्रता पुष्कळ लोकांत असते व ह्याची मुग्धावस्था अल्पकालीन असते.