पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १८९ आली व हिने सुमारे दोन कोटी लोक ह्या देशांत मेले असावे. ऐन आरंभीं औषधोपचार झाल्यास शेकडा एक देखील दगावला नाहीं. चवथ्या दिवशीं व पुढें उपाय सुरू केलेल्या लोकांत शेंकडा २०/२५ मृत्यु पावले. स्पर्शसंचारी अभिष्यंद ( डोळे येणें ) नेत्रविकारांपैकीं दोन आजार स्पर्शसंचारी आहेत. (१) दि ग्रे मॅन्युलेशन ( ट्रॉकोमा ), (२) प्युज्युलंट कंजंक्टैवैटिस. प्रत्यक्ष संसर्गानें किंवा वाळलेल्या पुवाचे कण हवेंत उडून त्यांचा संसर्ग घडल्याने हा आजार पसरतो. परमा व नवीन जन्मलेल्या मुलांना होणारा अभिष्यंद हे फार जहरी व दृष्टीस घातक असून थंड देशांत अंधत्व उत्पन्न करतात. सांथीचा न्युमोनिया न्युमोनियाच्या कधीं सांथी येतात व कचित् वेळीं जगद्यापी सांथी देखील पसरतात. एक हजार वस्तींत कांहीं सांथींत पांच मृत्युसंख्या झाली आहे. सांथीचें कारण अजूनही समजलें नाहीं. सूतिकाज्वर ( परप्युरिअल फीवर ) शरिराचे बाहेरील जंतूंचा सर्शसंचार जननेंद्रियापर्यंत झाल्यानें हा रोग होतो. प्रसवकाळीं व पुढे थोड्या दिवसांत अस्वच्छ कपडे, अस्वच्छ हात व जंतूंच्या संचाराविषयीं खबरदारी न घेणें ह्रीं याचीं कारणें आहेत. ह्या वेळीं जननेंद्रियांना थोड्याबहुत दुखापती झालेल्या असतात व रोग्याची शक्ति फार क्षीण असल्यानें प्रतिरोधक शक्ति नष्ट झालेली असते. प्रत्यक्ष प्रसूतिकाळीं होणारे सेप्टिसीमिया, पारमिया, सेप्टिक पेरिटोनैटिस, सेप्टिक मिट्रैटिस व पेल्विस संबंधी दुसरे शीघ्र प्रकारचे जंतुजनित दाह हे विकार परप्युरिअल फीवर ह्या व्याख्येत येतात, अशी लंडनच्या कॉलेज ऑफ फिजिशियन्सनें