पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० आरोग्यशास्त्र व्याख्या केली आहे. सुईण व सुइणीचे कपडे, बाळंतीण व तिचीं जननेंद्रियें, कपडे व प्रसवकाळीं व पुढे वापरावयाचे सर्व जिन्नस फार स्वच्छ व शुद्ध व जंतुविरहित असतील तर हा रोग होणार नाहीं. स्ट्रेटोकोकस पायोजिनस, स्टॅफिलोकोकस ऑरअस, गोनोकोकस व बॅसिलस कोटी कम्युनिस असे भिन्न जातींचे जंतू ह्या आजारांत -सांपडतात. आरोग्याच्या नियमांविरुद्ध स्थिती व विशेषतः गर्दी व मोऱ्यांचा निकाल न होणे ह्यांमुळे हवा दूषित होऊन हा आजार उत्पन्न होत असावा. परप्युरिअल फीवरचे प्रसाराच्या प्रतिबंधार्थ सुइणीला दुसऱ्या बाळं- तिणींचीं कामें करण्याचें सोडावयास लावावें. तिचें सर्व शरीर, नखें, केस, कपडे, हत्यारें इत्यादींची पेटी यांचें पूर्णपणें निर्जंतुकरण केल्या- शिवाय तिला बाळंतिणीला शिवं देवू नये. कॅन्सर हा आजार अनुवांशिक दिसत नाहीं. रोगाचें कारण समजत नाहीं. परंतु स्थानिक क्षोभ व दारूबाजी हीं प्रावण्य कारणें आहेत. हुमॅटिक फीवर " हा आजार विशिष्ट प्रकारचा असल्याचें अलीकडे आढळून आलें आहे. साध्या संधिवातापासून हा भिन्न आहे. ह्या मताबद्दल पुरावा खाली दिला आहे. (१) ३ ते ६ वर्षांनी ह्या रोगानें पुष्कळ लोक पछाडतात किंवा हा साथीच्या रूपाने पसरतो. (२) अपुरी पर्जन्यवृष्टि, अंतभौम जलाची सपाटी खोल जाणें, पृथ्वी तप्त होणें ह्यांचा ह्या आजाराशी संबंध असतो. (३) ज्वराचें स्वरूप आणि सांध्यांची हृदाची विकृती ह्यांचं स्पष्टीकरण, जंतू हे ह्या रोगाचें कारण आहेत असें मान- ल्यानें होतें. (४) सोडिअम सॅलिसिलेट इत्यादींचा पुष्कळ उपयोग