पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १९१ होणें ही गोष्ट ह्या विचारसरणीला अनुकूल आहे. इंग्लंड व इतर देशां- तील बॅक्टेरिआंत निपुण गृहस्थांना ह्या रोगांत डिप्लोकोकस सांपडलें आहे. जनावरांत ह्या जंतूंचा प्रवेश केल्यास सांध्याचा व हृदाचा विकार होऊन तीं मरतात. उपदंश (सिफिलिस) हा रोग स्पॅरोकिटा पॅलिडा (Spirochaete pallida) ह्यानें उत्पन्न होतो ह्यति संदेह नाहीं. चट्ट्याच्या मांसल भागांत किंवा त्यांतील पुवांत हे जंतू सांपडतात. हे जंतू सांपडले नाहीत तर चट्टा उपदंशाचा नव्हे असे मात्र मत करून घेऊं नये. सुजलेल्या पिंडांत, द्वितीय उपदंशांतील स्फोटांत व उपदंशांतील कांहीं अवस्थांमध्ये रक्तांत देखील हे जंतू सांपडतात. तृतीयोपदंशाच्या जखमांत व दूषित भागीं हे कचित् सांपडतात. परंतु सजन्मोपदंशांत हे निनिराळ्या त्वचांत पुष्कळ सांपडतात. जनतेमध्यें उपदंश आजार बराच आहे असें मानण्यास पुष्कळ जागा आहे. रोज दिसणारे व घातक असे कांहीं आजार उपदंशा- पासून होतात असे आतां समजण्यांत आलें आहे. ह्यांपैकीं कांहींची नांवे येथे दिली आहेत. जनरल पॅरॅलिसिस, टेबीज डॉर्सेलिस, एओर्टिक स्क्लोरोसिस, एओर्टिक ऍन्युरिजम व कदाचित् कंजेनिटल इडिअसी अथवा इंबेसिलिटि. ह्यांपैकी पहिल्या तीन आजारांना पॅसिफि- लिटिका " रोग असे नामाभिधान अलीकडे मिळाले आहे. वासर्मन, नेसर व ब्रक ह्यांच्या शोधांनी उपदंशाची पूर्ण परीक्षा सरिमनें करतां येते. उष्ण कटिबंधांतील विकार विषूचिका ( एशिअॅटिक कॉलरा) 66 गंगेच्या मुखाशी व हिंदुस्थानच्या इतर भागांत व एशीआ खंडांत