पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ आरोग्यशास्त्र . . खालील उदाहरणावरून स्पष्ट होते. हांबुर्ग शहराला अशोधित पण मैला वगैरे न मिसळलेले पाणी येत असे. परंतु हांबुर्ग शहराचा मैला ज्यांत पुष्कळ मिसळला असे त्याचे एल्ब नाचे खालचे भागाचे पाणी आल्टोना शहराला जाते. परंतु आल्टोनामध्ये हे पाणी काही दिवस सांठ- वतात. नंतर हे शोधून उपयोगात आणतात. हांबुर्ग शहरांत विषुचिकेचा (Cholers ) तडाका चालला असतांना आल्टोना शहर पार बचावले. झरे नैसर्गिक आंतीम जलाचा उपयोग लहान समाजाला व खेड्यांना नदीचे जलापेक्षां पुष्कळ बाबतीत अधिक होतो. नर्दीच्या पाण्याप्रमाणे ह्याला जलनिधी लागत नाही; व ह्याने जागा अडत नाही. हे जल दूषित होण्याचा कमी संभव असतो. बिघडल्यास त्याची शुद्धि जलद व सहजरीत्या होते. पृथ्वीच्या फार खोल भागापासून निघणाऱ्या झऱ्याचे पाण्यांत खनिजद्रव्ये आतिशय असल्यामुळे त्याचा उपयोग औषधी- प्रमाणे करतात. असल्या झऱ्यांचे पाणी आंतर्भीम वायंच्या दाबामुळे वर कारंज्याप्रमाणे येते. ह्यांना खनिज झरे म्हणतात. जमिनीवर पडणारा पर्जन्य तिच्यांत झिरपत जातो. पुढे अभेद्य अशा खडकांचे थरावर पोहचल्यानंतर पाण्याची अधोभागी जाण्याची गति बंद होऊन, असल्या खडकाच्या कमीज्यास्त उंचीच्या मानाने कमी ज्यास्त उंचीवर झिरपून गेलेले पाणी साठते. भूपृष्ठाचे खाली असलेल्या ह्या पाण्याची सपाटी पाऊसकाळाच्या कमिआधिक मानाप्रमाणे कमी ज्यास्त असते. खोल व उथळ असे झऱ्यांचे दोन भेद आहेत. उथळ झऱ्यांची उत्पत्ति मर्यादित जलसंचयापासून होत असल्याने ते बहुधा उन्हाळ्यांत आटतात. भूगर्भातील जलाचे वरभागी असणाऱ्या खडू इत्यादि पदार्थांच्या थरामध्ये भेग पडल्याने आंतील उदक बाहेर पडते. हे बहुधा सर्व साल- .