पान:आरोग्यशास्त्र.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ आरोग्यशास्त्र कॉलरा (एंडेमिक) हा नेहमींचा आजार आहे. ह्या स्थानापासून त्याच्या सांथी अन्य प्रांतांत व दूरच्या देशांत आजारी माणसांमुळे किंवा दूषित पदार्थामुळे पसरतात. जलाच्या द्वारा ह्या आजाराचा बहुतेक वेळा प्रसार होतो. ह्याचे जंतू रेचामध्यें असतात. मळाचा संपर्क ओढे, विहिरी व तलाव ह्यांना होतो. माशांमुळे ह्या रोगाचा प्रसार होतो. उष्णता व आर्द्रता ह्यांचा परिणाम ह्या आजाराचे वाढीवर होतो. हवा व भूपृष्ठ तप्त असल्याने ह्या रोगाचा विषार तीव्र होतो. गंगेच्या मुखाशीं उष्णता व आर्द्रता असल्यानें तेथें ह्या रोगाची कायमची वस्ति आहे. कॉलऱ्याचे जंतू घाणेरड्या पाण्य सोडल्यास त्यांचा संहार सप्रोफिटिक बॅक्टेरिया लवकर करतात. परंतु मळामध्ये ते दोन तीन महिनेपर्यंत टिकतात. कॉलऱ्याची मुग्धावस्था सामान्यत्वें एक दोन दिवस असते. परंतु ती कधी दहा किंवा अधिक दिवसहि असते. सांथीचे भरांत स्पर्शसंचाराची भिति फार असते. सांथीचे भरांत मृत्युसंख्येचे प्रमाण मोठे असतें. आरंभी व शेवटी ते कमी असतें. सांथीच्या वेळी सार्वजनिक पाण्याचे निधी शुद्ध ठेवण्याची शक्य तितकी खबरदारी घ्यावी. त्या वेळीं वागण्याविषयींच्या सूचना जनतेला हस्तपत्रकांनी द्याव्या. कच्च्या भाज्या व फळे वापरू नयेत. घरांत पूर्ण स्वच्छता ठेवावी. पाणी व दूध वापरण्यापूर्वी त्यांना उकळी येऊ द्यावी. व पातळ रेच झाल्याबरोबर तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. संग्रहणी आंव (डिसेंटरी ) संग्रहणी आजारांत पोटांत मुरडा होऊन रक्त व आंव पडते. हा आजार कधीं विलंबी रूप धारण करतो. कारणे :- मलमूत्रादि उत्सर्जित पदा- यांनी राहण्याची जागा किंवा तेथील पाणीपुरवठा दूषित होणे, घरांत