पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ आरोग्यशास्त्र होतो. मानवी रोग्यांकडूनच विषाराचा प्रसार होतो असें नाहीं. घुशी, उंदीर, गिनीपिग, माकडे, डुकरें व बहुधा मेंढ्या, शेळ्या, कुत्रीं व दुसरीं जनावरें ह्यांना हा रोग होतो. चीन व हिमालयाचे भागांत प्लेगाला " उंदरांचा आजार " असें म्हणतात. प्लेग-लॅबोरेटरीमध्ये शेंकडों माशा व पिसवा असतात व त्यांचेमध्यें (Bacillis pestis) बॅसिलिस पेस्टिस सांपडतात. डासांप्रमाणें ते प्लेगचा प्रसार करतात. काळ्या उंदरांना मनु- ष्याचे अगोदर प्लेग होतो व ह्या प्राण्याचे मुळे प्लेगचें अस्तित्व व प्रसार स्वात्रीने होतो. धान्याचे जहजांतून, दूषित बंदरांपासून चांगल्या बंदरांत ह्या प्राण्यांमुळे प्लेगाचा प्रसार होतो. उंदरांपासून उंदरांना हा आजार होतो व उंदरांपासून पिसवांचे मार्फत माणसांना होतो. प्लेगाचा उंदीर मेल्यावर त्याच्या अंगावरच्या दूषित पिसवा घरांत शिरतात व माणसाला चावून पिचकारीने सोडल्याप्रमाणे मनुष्याचे अंगांत प्लेगाचे जंतू सोडतात. दूषित माशांच्या मळांत बॅसिलस पेस्टिसचे पुंज असतात. ह्या अंगा- वर बसल्यावर उघड्या व दुसऱ्या जागांवर ह्यांचा मळ साहजिकपणें पडतो. तेथें कंडू सुटल्यावर मनुष्य खाजवितो व ते बॅसिलस आयतेच शरिरांत प्रवेश करतात. व ते बॅसिलस त्वचेच्या लिंफॅटिक पिंडामध्यें जातात. त्यामुळें खाक, मांडी किंवा मान ह्यांतील गांठी सुजतात. काळ्या हिंदी उंदरांच्या अंगावरील पिसवा मनुष्याच्या पिसवांसारख्या बहुतेकांशीं असतात. ह्या उंदरांची वस्ती घरांत असते. उंदीर असलेल्या घरांत हिंदी लोक राहतात, म्हणून त्यांचेमध्यें प्लेग विशेषकरून होतो. युरो- पियन लोकांच्या घरीं उंदरांना थारा नसतो व तें झालेच तर त्यांचा नायनाट केला जातो. ब्रौन अथवा उदी उंदरांच्या अंगावरील पिसवा प्लेगचा फैलाव करतात असे पहाण्यांत आलें नाहीं. त्या उंदरांचा आजार त्याच जातीच्या उंदरांना होतो व कधीं माणसांनाहि होऊं शकेल. उदी उंदीर १८ व्या