पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १९५ शतकांत इंग्लंडांत आले. त्यांनी पूर्वीच्या काळ्या उंदरांचा नायनाट केला. उदी उंदीर घरांत राहत नाहींत. परड्यांतील सोपे, खंदक, मोया, खुलीं मैदानें ह्यांत राहतात. म्हणून त्यांचा व माणसांचा निकट शेजार नसतो. म्हणून इंग्लंडांत एखाद्या ठिकाणच्या उंदरांत प्लेग झाल्यास त्यांची सांथ माणसांत पसरत नाहीं. उंदरांवरील बॅसिलस पेस्टिस माणसांच्या जंतूंहून भिन्न व सौम्य असतात. प्रत्यक्ष रोगी मनुष्याचा स्पर्श व सान्निध्य हें लेगाच्या प्रसाराचे गौण कारण आहे. दारिद्र्य, घाण, दाट वस्ती व प्राणिज पदार्थांनी जमीन दूषित झालेली असणें हीं प्लेगचीं प्रावण्य कारणें आहेत. परंतु उंदीर असलेल्या घरांत राहणें हॅप्लेगाचें मुख्य कारण आहे. पिण्याच्या पाण्यानें प्लेग पस- रतो असें अजूनही नजरेस आलें नाही. परंतु फार दिवसपर्यंत प्लेग- जंतू पाण्यांत जिवंत राहतात. फोर्मेटचे अंगीं विष राहतें व तें त्यांचे द्वारां पसरतें. प्लेगाचे ( १ ) ब्युबॉनिक, (२) न्युमॉनिक, व ( ३ ) सेप्टिसी - मिक असे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार बहुतेक वेळीं दिसतो म्हणून ह्या आजारास ब्युबॉनिक प्लेग असें नांव पडलें आहे. न्युमोनिक प्रकारांत कफांत प्लेगचे जंतू विपुल सांपडतात. ह्या प्रकारांत रोगाचा प्रसार फार होतो. म्हणून तोंडाला जाळी लावल्याशिवाय रोग्याजवळ जाऊं नये. सेप्टिसीमिक प्रकार देखील फार सांसर्गिक आहे. ब्युबॉनिक प्लेगाची मुग्धावस्था दोन ते सात दिवसांची असते. रोग- चिन्हें दिसूं लागल्यावर बहुधा चोवीस तासांत किंवा कमी वेळांत मांडी, खाक, मान किंवा क्वचित् वेळीं अन्य ठिकाणीं गांठ उठते; व आरंभा- पासून बहुधा अठ्ठेचाळीस तासांच्या आंत मृत्यु येतो. आठ दिवस लोटल्यावर मृत्यु सहसा येत नाहीं.