पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १९९ ह्याला सहाय्य होतें. मलेरियाच्या प्रांतांत कांहीं वर्षे राहणाऱ्या लोकां- मध्ये थोडीशी निर्भयता (Immunity ) आलेली असते. प्रसाराच्या प्रतिबंधासाठीं उपायः -- रोग्याची परीक्षा करावी. मलेरिया आहे असें ठरल्यावर त्याला दूर वेगळें ठेवावें. डांस चावूं देऊं नयेत. कारण त्याचेमुळे निरनिराळ्या प्रकारचे मलेरियाचे जंतूंचा प्रवेश होऊन रोग्याची अवस्था बिघडेल. शिवाय त्याचें रक्त खाणारे डांस दूषित होऊन त्याच्या रोगाचा फैलाव करतील. रोग्याला सपाटून कुनीन द्यावें. ह्या द्रव्याने रक्तांतील जंतूंचा नाश होतो. डांसांना टर्पेटैन, मेंथाल व लसूण ह्यांच्या वासानें फार उपद्रव होतो. तंबाखूच्या, गंधकाच्या व लांकडाच्या देखील धुराने त्यांना फार त्रास होतो. असल्या वासाच्या जवळ ते सहसा रहात नाहींत. मलेरियाच्या भागांत राहणारे लोकांनी डांस न चावू देण्याची खबर - दारी घ्यावी. म्हणून बुरखा, हातमोजे व पडदे वापरावेत. अंगाला कापूर व युकलिप्टस् घातलेलें मलम लावावें. ह्यासंबंधीं रात्रीं विशेष खबरदारी घ्यावी. अंगाला गारठा लागू देऊं नये. महारोग (लेप्रसी ) बॅसिलस लेप्री ह्या जंतूंचा प्रवेश कांहीं मार्गानें शरिरांत झाल्यानें लेप्रसी हा रोग होतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संसर्गानें हा आजार निरोगी माणसाला होतो किंवा कसें ह्याबद्दल अद्यापि संशय आहे. रोग्यांचे पति किंवा पत्नि किंवा आईबाप त्यांचेबरोबर खुशीनें सिग्रीगेट होऊन मोलोकाई बेटांत राहतात. त्या बेटांतील मूळच्या रहिवाशांत महारोग ज्या प्रमाणांत होतो त्यापेक्षां ह्या नवीन गेलेल्या निरोगी नाते- वाईक लोकांत तो अधिक प्रमाणांत होत नाहीं. स्पर्शसंचारानें महारोगाचा प्रसार होतो हें दाखविण्यासाठी दिलेली माहिती, महारोग