पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० आरोग्यशास्त्र नेहमीं असणाऱ्या प्रदेशांतील असल्यामुळे त्या स्थानाचाहि परिणाम तेथे राहणाऱ्या लोकांवर झालेला असेल असे मानावें लागतें. श्वासोच्छ्रासनाच्या ऊर्ध्व मार्गानें लेप्रसीचा प्रवेश शरिरांत होत असावा असें दिसतें. पिसवा वगैरेमुळे रोगजंतूंचा शरिरांत प्रवेश होणें संभवनीय आहे. बेरी-बेरी बेरीबेरी हा उष्णकटिबंधांतील रोग आहे. ह्याच्या सांथी थोडया स्थळीं, जसें खाणी, थोडीं घरें, मळे इत्यादींमध्ये पसरतात, किंवा लांबवर पसरल्यास हा रोग नियमित व लहान स्थळीं होतो. मृत्यूचें प्रमाण रोग्यांमध्ये शेंकडा ५ ते ५० असतें. एका माणसापासून दुसऱ्या मनुष्याला हा रोग होतो अशाविषयीं पुरावा नाहीं. ह्या आजारानें चलनवलनाच्या क्रिया कष्टप्रद होतात. बहुधा हातापायांचें पॅरॅलिसिस (घात) होतें. स्पर्शज्ञान विकृत होतें. चर्मांत शोध होतो व सीरस पोकळ्यांत द्रवसंचय होतो. ह्या रोगाचे कित्येक प्रकार आहेत. एका प्रकारांत मेंदूच्या भावना ज्यास्त असतात, दुसऱ्यांत श्वासाची इंद्रियें अधिक बिघडतात, तिसऱ्या शोधाचे प्रकारांत रुधिरा- भिसरणाचीं इंद्रियें व्यापिलीं जातात. हा आजार विलंबी जातीचा आहे. केर, घाण, दमटपणा व गर्दी ह्रीं ह्याचीं प्रावण्य कारणें आहेत. ज्यांच्या अंगावर खुल्या जखमा असतात अशा रोग्यांपासून दुसऱ्या लोकांमध्ये जंतुसंचार होतो. हा आजार अन्नापासून ( उ० शिळ्या भातांत ह्याचें विष उत्पन्न होतें. ) होतो असें पुष्कळ लोक मानतात. अन्नांत बदल करणें, तूप, चरबी, दूध इत्यादि पौष्टिक व नैट्रोजनविशिष्ट पदार्थ ह्यांचा उपयोग रोग कुंठित करण्यांत मोठा होतो. सोमलाचा न्युरैटिस, मलेरियाचा कॅकेक्सिया, पेलाग्रा, स्कर्वी व पर्निशियस ऍनीमिया हे रोग यलोफीवर सारखे आहेत.