पान:आरोग्यशास्त्र.pdf/२०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २०१ यंत्रानें सडलेले, पांढरे सफेत व बिलकूल कोंडा नसलेले तांदूळ खाण्याचा बेरीबेरीशी संबंध आहे. पक्ष्यांना असे तांदूळ चार- ल्यास त्यांना बेरीबेरीसारखा रोग होतो व थोडा कोंडा असलेले चारल्यास होत नाहीं. मुख्यतः भात खाणाऱ्या लोकांस हें विधान व्यास्त लागूं पडतें. कोंड्यांत मज्जेला हितावह द्रव्ये असतात. भात न खाणाऱ्यांत हा रोग झाल्यास त्यांच्या खाण्यांत कोंड्यासारखे द्रव्य नसल्यानें तो होतो. हा आजार फक्त ऊष्णकटिबंधांत होतो. ह्यांत स्नायूंमध्यें व सांध्यांत फार वेदना होतात. कधीं कधीं चर्मावर फोड येतात. ऊष्ण देशांत, कोरड्या व उन्हाळ्याच्या दिवसांत हा उत्पन्न होतो. एकदां झाल्यावर हा रोग त्याच माणसास पुन्हां होत नाहीं. प्रत्यक्ष संसर्गानें हा रोग पसरतो. एपिझटिक डिसीजेस ऍटॅक्स हा आजार चतुष्पाद जनावरांत मुख्यतः होतो. परंतु सर्व प्राण्यांत तो होऊं शकतो. सांसर्गिक द्रव्य बहुधा अन्नमार्गानें शिरतें. परंतु तें कधीं कधीं श्वासमार्गानेंहि शिरतें. कीटकांचे दंश, ओरखडे ह्यांमुळे तें चर्मावाटें शरिरांत जाते. जनावरांचे मलमूत्रानें जमीन दूषित झाल्यावर सर्व कळपांत हा रोग जल्दी व फार पसरतो. ह्या आजारानें मेलेलीं जनावरें वरवर पुरली तर जमिनींतील कीटकांचे द्वारा हा रोग पृष्ठ- भागावर येईल. मलमूत्रानें गवत बिघडतें व त्यांत ह्या जंतूंचे स्पोअर्स पुष्कळ मुदतपर्यंत जिवंत राहतात. दूषित झालेल्या रानांत चरल्यानें जना वरांच्या मुखांतील ओरखडयांतून व कदाचित् अन्ननळांतून ह्यांचा प्रवेश