पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी १३ भर टिकतें. खोल भागांतून येणारें जल जरी चवदार व आरोग्यकारक असतें तरी, त्यांत क्षाराचें प्रमाण ज्यास्त असल्यानें धुण्याचें, स्वयंपाकाचें व कारखान्याचें कामीं कमीच उपयोगी पडतें. भूगर्भात साठलेलें जल उच्चस्थानापासून हळुहळू गुरुत्वाकर्षण- शक्तीनें उतरत उतरत ज्या मुखावाटें तें बाहेर येतें, अशा स्वाभाविक तोंडाकडे तें वळतें व नंतर बाहेर येतें. स्वाभाविक झऱ्याची अशी उत्पत्ति आहे. विहीरींत लागणारें झऱ्याचें पाणीहि असेंच उच्चभागांतून आलेले असते. तलावाप्रमाणें झऱ्याचे भोंवतीं कुंपण करून त्याचेजवळ कोणीहि न येईल अशी व्यवस्था करावी. शिवाय त्यांत केरकचरा न पडेल अशी तजवीज करावी. झऱ्याचें पाणी नलिकाद्वारें दूर न्यावें व तें वापरावें, अथवा तें हौदांत सांठवावें व तेथून इच्छेप्रमाणें तोटीचे त्याचा उप- योग करावा. विहीरी विहीरींना खोलीवरूनच उथळ, खोल, अतिखोल अथवा आर्टेशियन अशा संज्ञा देतात. पन्नास फूटांहून कमी खोलीच्या विहीरींना उथळ विहीरी ह्मणतात. वरचे भागीं असणाऱ्या विहरी भुसभुशीत कंकरांत किंवा वाळूमध्यें खणलेल्या असतात. ह्यांचें उदक असमंत भागांतील जलाप्रमाणें असतें. विहीरीचें पाणी अल्पसंख्याक वस्तींच्या खेडेगांवांना सोईचें असतें. पूर्वी गांवांतून देखील वापीजल पीत असत. परंतु, सध्यां इंग्लंड देशांत तें निषिद्ध ठरलें आहे. कारण शौचकुपांतील घाण द्रव्यें व आसमंतांतील प्राणिजं द्रव्ये पाझरून जमीनींत झिरपतात व शेवटीं तीं विहीरींचे झऱ्यांचें ओलीला जाऊन मिळतात. अशा रीतीनें प्रत्येक विष्ठेचा सत्त्वभाग कूप- जलांत जाऊन पोहोचतो. म्हणून, हें जल किती त्याज्य आहे ह्याचा वाच- कांनी विचार करावा.