पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ आरोग्यशास्त्र जनावरांत होतो. उन्हाळ्यांत व ऊष्ण, भुसभुसीत, दमट व सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीचे टापूंत व विशेषतः दलदलीचे व बॉगी प्रदेशांत हा आजार फार होतो. कातड्याचे कारखान्यांतील चघळ व कांहीं प्रकारचीं खतें व परदेशांतून आणलेले खाद्य ह्यांनी स्पर्शसंचार होतो. आजारलेल्या जिवंत प्राण्यापासून विषाचा संचार मनुष्यांत होण्याचा संभव आहे. परंतु अशा प्राण्याला मारतांना व त्याचें कातडें सोलतांना तो बहुधा होतो. असल्या जनावरांचें मांस खाण्यानें तो होण्याचा संभव आहे. रशिया व चीन वगैरे देशांतून येणारी लोकर, कातडी व केस ह्या पदार्थांच्या संपर्कानें हा रोग होतो. रक्ताने भरलेली लोकर व केस ह्रीं जंतुवाहक द्रव्ये आहेत. जंतूंचा संचार हात, पाय, तोंडें इत्यादि भागांवरील ओरखड्यांतून होतो. असें झाल्यास त्या ठिकाणीं पूय स्फोट होतात किंवा मुखांतून व फुप्फुसाचे द्वारा जंतू प्रवेश करितात. असें झाल्यास सर्व रक्त दूषित होते व थोडे दिवसांत मृत्यु येतो. सार्वदेहिक जंतुसंचाराच्या भावना स्पष्ट नसतात. ज्या इंद्रियांत जंतूंचा संचार प्रथम होतो त्यासंबंधी भावना ज्यास्त होतात. धुरळा पोटांत गेला असल्यास जठर व आंतडीं मुख्यतः बिघडतात. जर धुरळा हुंगण्यांत आला तर फुप्फुसें बिघडतात. स्फोटांच्या सिरममध्यें व मृत्यूनंतर रक्तामध्ये जंतू ( बॅसिली ) सांपडतात. अन्ननळाचे द्वारा जंतुसंचार क्वचित् घडतो. मनुष्यांत श्वासोच्छ्वस- नाचे इंद्रियांत हा आजार होतो. श्वासमार्ग व स्वासनळ्यांमध्ये प्रथम जंतुसंचार होतो. नंतर तेथून जंतू पिंजराच्या दुसऱ्या पिंडामध्यें पसरतात व सरतेशेवटीं फुप्फुसांत जाऊन पोहोचतात. ह्या आजाराचे खालील प्रकार दिसतात. (१) ' एपॉप्लेक्टिक 'मेंदूंत रक्ताचा स्राव झाल्याच्या भावना होतात. जनावरांचे झोक जातात. तीं