पान:आरोग्यशास्त्र.pdf/२११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २०३० भुईवर पडतात. आचके येतात, व थोड्या मिनिटांत किंवा फार तर तासांचे आंत मरतात. मेंढ्यांत व शेळ्यांत हा आजार विशेषतः होतो. ( २ ) प्रथम अस्वस्थता, नंतर आचके, बेशुद्धि व मृत्यु • हा विकार दोन ते चोवीस तास राहातो. हा मुख्यतः गुरांत होतो. ( ३ ) ऍथँक्स ज्वर हा प्रकार सर्वांत ज्यास्त वेळां होतो. ज्वर एक ते सात दिवस टिकतो. शेवटीं दुसऱ्या प्रकाराप्रमाणें भावना होतात. ( ४ ) का क्युलर डिसीज चर्मावर गोल गांठी उठतात. त्यांत पू होत नाहीं. परंतु शेवटीं मऊ होतात. मुख, घसा, कृक ह्यांचे म्यूकस अशाच गांठी उठतात. ह्याची मुदत ३ ते ७ दिवस असते. हा फार घातक आहे. शेंकडा २५ रोगी दगावतात. उपायः -- इंग्लंडांत थोड्या वर्षांपासून ( Sclavo's anti-anthrax serum) स्त्रोचें ऍक्सप्रतिबंधक सीरम वापरूं लागले आहेत. त्याचे परिणाम उत्तेजन देणारे आहेत. आरोग्यासंबंधीं सावधगिरी ( १ ) प्रत्येक कामकऱ्यानें कफनी (ओव्हर ऑल) वापरली पाहिजे. (२) चर्मावर ओरखडा किंवा जखम इ० असलेल्या इसमास कामावर घेऊं नये. (३) चर्मावर फोड किंवा दुसरे कोणतेंहि संशयी चिन्ह झाल्याबरोबर मॅनेजरला कळवावें, म्हणजे रोगाचे बाल्यावस्थेत उपाय होईल. ( ४ ) कामकऱ्यांनीं शरिराचे उघडे भाग वरचेवर धुवावे. विशेषत: : भोजनापूर्वी धुवावे. (५) मालाचे गड्ढे पाण्यांत बुडवावे म्हणजे धुरळा ओला होईल व उडणार नाहीं. (६) (घोड्याचे) केस शिजवावेत. (७) सर्व कचरा व चघळ गोळा करून जाळून टाकावा.